Weight Loss Food: एक भाजी चटकन वितळवेल चरबी; पोट सुटलंय म्हणणंच विसरुन जाल
व्यायाम करण्यास अडचणी, हाताशी कमी असणारा वेळ या साऱ्यामुळं वजन वाढण्यात आणखी वाव मिळतो.
Pointed Gourd For Weight Loss: सध्याच्या धावपळीच्या दुनियेत वाढलेलं वजन ही या पिढीसमोर असणारी मोठी समस्या आहे. मुळात हे वाढलेलं वजन सहजासहजी कमी होत नाही, हे त्यांच्यापुढे असणारं एक मोठं आव्हान. बिघडलेल्या आहाराच्या सवयी, व्यायाम करण्यास अडचणी, हाताशी कमी असणारा वेळ या साऱ्यामुळं वजन वाढण्यात आणखी वाव मिळतो
उन्हाळ्याचे दिवस वजन कमी करण्यात आणखी अडचणी आणतात, कारण या दिवसांमध्ये पचनसंस्था काहीशी कमकुवत झालेली असते. पण, आता मात्र वजन वाढण्यापासून शरीरात चरबीचं प्रमाण कमी होण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींवर रामबाण उपाय समोर आला आहे.
यासाठी तुम्हाला फक्त एकाच भाजीचं सेवन करायचं आहे. ही भाजी म्हणजे परवल (Pointed Gourd). खाण्यासाठी चवीष्ट असण्यासोबतच परवलमध्ये आरोग्यवर्धक गुणही असतात. यामध्ये विटामिन आणि फायबरसारखे तत्त्व असतात.
परवलच्या सेवनाने रक्त शुद्धीकरण आणि शरीरातील टिश्यू सुदृढ राहतात. परवल खाण्यासाठी तुम्हाला फक्त या पाच पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे.
- परवल उकडून सलाडमध्ये मिसळून खावं.
- परवलचं पाणी प्या.
- परवलची भाजी खा.
- परवलं भरीतही तुम्ही खाऊ शकता.
- परवलचा रस करून तुम्ही तोसुद्धा पिऊ शकता.
परवरल ही एक तंतूमय भाजी आहे. ज्यामुळं आपल्या पचनसंस्थेत सकारात्मक बदल होतात. यामुळं मेटाबॉलिजम वाढून वजन कमी होण्यास मोठी मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा नक्की समावेश करा.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)