मुंबई : बऱ्यादा खराब जीवनशैली आणि बाहेरच्या आहारामुळे लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. ज्यामुळे लोकांना वजन वाढण्याच्या समस्या उद्भवू लागतात. ज्यानंतर लोकं आपलं वजन कमी करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना हे सहजासहजी जमत नाही. कारण एकदा का वजन वाढलं, की ते कमी करणं फारच कठीण आहे. अशा परिस्थितीत जे लोक फक्त चालण्यावरती भर देतात. चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि काही प्रमाणात वजन कमी करण्यासाठी ते प्रभावी देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही व्यवस्थित चालले तर 500 कॅलरीजही कमी होऊ शकतात. परंतु हे लक्षात घ्या की, कसं ही चालून वजन कमी होणार नाही. यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने चालणे गरजेचं आहे.


तर आता कशा प्रकारे चालल्याने वजन कमी करता येते, हे जाणून घेऊया.
- वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला वेगाने चालणे आवश्यक आहे, हळू चालून वजन कमी होणार नाही.


- स्पीड वॉक करताना त्याची सुरुवात स्लो चालण्यापासून करावी.


- तसेच तुमचे पाय लयीत राहून वेगाने एकामागून एक पडले पाहिजेत.


- स्पीड वॉकिंग नीट केले तर पोटाची चरबीही कमी होऊ शकते.


- तुम्हाला सरळ मुद्रेत चालावे लागेल जेणेकरून तुमच्या शरीरावर ताण येईल.


- परंतु या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही थांबून थांबून चालू नये.


- प्रत्येक वेळी एकदा ब्रेक घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होत नाही, किमान 15 मिनिटे नॉन-स्टॉप चालणे आवश्यक आहे.


- एकूणच, तुम्ही 25 मिनिटे स्पीड वॉक केले पाहिजे, ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर दिसून येतो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)