Weight Loss: शरीरातील फॅट कमी करायचंय? कार्डियो एक्सरसाईजपेक्षा `ही` गोष्ट करेल मदत
आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कार्डिओ व्यायाम न करताही वजन कमी करू शकता.
Weight Loss: जेव्हा वजन कमी (Weight Loss) करायचं असतं तेव्हा अनेकजण जिममध्ये (Gym) जाण्याचा विचार करतात आणि कार्डिओ व्यायाम (cardio exercise) करू लागतात. कार्डिओ व्यायामामुळे हृदयाची गती वाढते आणि काहीवेळा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कार्डिओ व्यायाम (cardio exercise) केल्याने हृदयविकाराचा धोका राहतो, असं अनेकवेळा आपण ऐकलं असेल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कार्डिओ व्यायाम न करताही वजन कमी करू शकता.
आहारावर नियंत्रण ठेवा
जर तुम्ही तुमच्या आहाराचं वेळापत्रक योग्य ठेवलं तर कार्डिओ व्यायाम न करताही वजन नियंत्रित करू शकता. शरीराचे वजन वाढवण्यात चरबीची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा तुम्ही जास्त खाता आणि कॅलरी बर्न करत नाही तेव्हा शरीरातील चरबी वाढते. त्यामुळे कॅलरीजचं प्रमाण कमी केल्यास तुमची चरबीही हळूहळू कमी होऊ लागते. जर तुम्ही दररोज 2000 Kcl अन्न घेत असाल तर 1400-1500 Kcl घेणं सुरू करा.
2 फळं आणि 2 हिरव्या भाज्या
आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला कार्डिओ व्यायाम न करता वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही दररोज तुमच्या आहारात 2 प्रकारची फळं आणि 2 प्रकारच्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे.
डाएट कंट्रोल म्हणजे उपाशी राहणं नाही
वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला अन्नाचं प्रमाण मर्यादित करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला आपली खाण्याची पद्धत बदलावी लागेल. चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असलेलं अन्न खाऊ नये. तुमच्या शरीराचं वजन जितकं जास्त असेल तितके जास्त प्रोटीन तुम्ही दररोज सेवन केले पाहिजेत.
जर तुमचं वजन 70 किलो असेल, तर तुमच्या शरीराला दररोज 70 ग्रॅम प्रोटीनची गरज असते, तसंच फायबरचं सेवन वाढवलं पाहिजं.