Mango Seed Benefits: आंबे खाल्ल्यानंतर कोय फेकू नका; जाणून घ्या भरपूर फायदे
Benefits of Mango Seeds: तुम्हीही नकळत आंब्याच्या कोयी टाकून देता? थांबा, तुम्हाला माहिती नसेल परंतु (How to use Mango Seeds) आंब्याच्या कोयीचे अनेक फायदे आहेत. कसे? या लेखातून जाणून घ्या तुम्ही आंब्याच्या कोयीचा (What are the Benefits of Mango Seeds) कसा वापर करून घेऊ शकता.
Benefits of Mango Seeds: सध्या आंब्याचा सिझन आला आहे तेव्हा तुमच्या घरी आंब्याच्या पेट्या या आल्याच असतील. रात्रीच्या अथवा दुपारच्या जेवणात आपल्या ताटात (Mango Seed Benefits in Marathi) आंब्याच्या फोडी अथवा आमरस ठेवलेला असेल. आपल्यापैंकी अनेक जण हे आंबा अख्ख्याचा अख्खा चोखून खातात आणि तो खाऊन झाला की आंब्याच्या आतील मोठी कोय फेकून देतात. आपण आंब्याच्या कोयी या त्याचा रस काढून झाल्यावर आणि फोडी काढून झाल्यावर काढून टाकतो परंतु थांबा, असं करू नका... कारण तुम्हाला कदाचित अजून आंब्याच्या कोयीचे फायदे माहिती (Do Not Throw Mango Seeds) नाहीत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल परंतु आंब्याच्या कोयी अनेक फायदे आहे. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात करून घेऊ शकता.
आपल्या नकळत आंब्याच्या कोयी फेकून देणं हे अगदी स्वाभाविकच आहे. कारण आपल्या मते, आंब्यांच्या कोयीचा फारसा उपयोग नसतो त्यामुळे आंबे पोटात आणि कोयी कचरापेटीत जातात परंतु तुम्हाला हे माहिती नसेल कदाचित की आंब्यांच्या कोयींचेही जबरदस्त फायदे आहेत. तेव्हा आज आंबे खायचा बेत असेल तर आंब्यांच्या कोयी (Healthy Benefits of Mango Seeds) फेकू नका तर त्याचा असा करा योग्य उपयोग
काय आहेत आंब्यांच्या कोयीचे फायदे
प्रथम आपण आंब्याच्या कोयीचे फायदे काय आहे हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आंबे खाण्याचे हे अनेक फायदे आहेत.
पिरियड्समध्ये तुम्हाला क्रॅम्प्सचा त्रास होत असेल तर तुम्ही आंब्याच्या कोयीचे सेवन करू शकता तसेच डायरियाच्या आजारातही या कोयीचे सेवन फायदेशीर ठरते.
तुम्हाला जर का कोलेस्ट्रॉलची चिंता सतावतं असेल तर आंब्यांच्या कोयी त्यावर चांगला उपाय आहे. याद्वारे तुमची प्रतिकार शक्तीही वाढते.
कसा करावा उपयोग?
तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की आंब्याच्या कोयीचे सेवन करायचे कसे? ते तर चावायला अत्यंत कडक असतात. तर तुम्ही त्याचा किस अथवा त्याची पावडर तयार करू शकता.
या कोयी तुम्ही प्रथम उन्हात सुकत ठेवा. आता त्याच्या वरचा भाग काढा आणि त्याचा आतील भाग बाहेर काढा. आता हा भाग मिक्सरमध्ये टाका. अथवा तुम्ही याचा किसही करू शकता. तोही बारिक करा. जर तुम्हाला पावडर बनवायची असेल तर या मिक्सरमधील मिश्रणात पाणी आणि मध टाका आणि त्याचे सेवन करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)