तुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
Side Effects of Sniffing Petrol: पेट्रोलचा सतत गंध घेण्याची एक सवय अनेकांना असते. पण त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. त्याची कारणे जाणून घेऊया.
Side Effects of Sniffing Petrol: पेट्रोल आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटकच बनला आहे. पेट्रोल नसेल तर, वाहने, रोजगार इतकंच काय तर अर्थव्यवस्था ठप्प पडू शकते. पेट्रोलच्या किंमतही सतत वाढत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला पेट्रोलबाबत एक अनोखी माहिती देणार आहोत. अनेकांना पेट्रोलचा गंध आवडतो. पेट्रोलपंपावर गेल्यावर येणारा गंध खूपजणांना आवडतो. तर, काही जण दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची पेट्रोलटँक खोलूनही गपचुप पेट्रोलचा गंध घेतात. तुम्हालादेखील ही सवय आहे का. तर, आत्ताच ही सवय थांबवा. कारण आरोग्यासाठी ही सवय घातक ठरू शकते. डॉ. पयोज पांड्ये यांनी पेट्रोलचा गंध घेणे हानिकारक ठरू शकते. कारण पेट्रोलमध्ये मोठ्याप्रमाणात लेड (Lead) असते. ज्यामुळं अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते.
पेट्रोलचा गंध घेण्याचे दुष्परिणाम
1. स्मोकिंगसारखा इफेक्ट
पेट्रोलचा गंध घेणे म्हणजे एकप्रकारे स्मोकिंग करण्यासारखेच आहे. पेट्रोलमध्ये असलेल्या अॅसिडिक गॅसेस शरीर पोखरुन काढते. जर तुम्हालाही ही सवय असेल तर कँन्सर आणि फुफ्फुसाचे विकार सारखे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.
2. ट्रेकियल डिसऑर्डर
पेट्रोलचा गंध घेतल्याने धोकादायक पार्टिकल्स श्वसनलिकेत जाऊ शकतात. यामुळं ट्रेकियल डिसऑर्डर होऊ शकतात. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि श्वसनासंबंधित त्रास जाणवू शकतात.
3 न्युरोलॉजिकल इफेक्ट
पेट्रोलचा गंध घेतल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होऊ शकतो. न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका वाढू शकतो. यामुळं डिप्रेशन, एक्स्ट्रा मेंटल प्रेशर आणि अनेक प्रकारचे मेंटल प्रोब्लम्स होऊ शकतात.
4 अॅडिक्शन
पेट्रोलचा सतत गंध घेणे याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होत असल्याने, ही सवय हळूहळू वाईट व्यसनात बदलू लागते, त्यामुळे जिथे जिथे तुमचे मित्र किंवा नातेवाईक हे करताना दिसले, त्यांना लगेच थांबवा.
5 पेट्रोल वाया जाते
पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. अशावेळी तुम्हालादेखील सतत पेट्रोलचा गंध घेण्याची सवय असेल तर ही वेळीच थांबवा. कारण सतत पेट्रोलचा गंध घेतल्याने पेट्रोल कमी होतो. पेट्रोलची टाकी उघडल्यास ते इवेपोरेट होते. ज्यामुळं पेट्रोलसारख्या महत्त्वाचे इंधन वाया जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)