मुंबई : मायग्रेनचा त्रास असणार्‍यांमध्ये डोकेदुखी तीव्र स्वरूपात जाणावते. प्रामुख्याने हा त्रास डोक्यामध्येच आढळत असावा असे सामान्यपणे तुम्हांला वाटत असेल. परंतू मायग्रेनचा त्रास हा पोटदुखीच्या स्वरूपातूनही वाढतो. मायग्रेन केवळ डोक्यात नव्हे तर पोटातही त्रासदायक ठरू शकतो. पोटात वाढणार्‍या या त्रासाला अ‍ॅबडॉमिनल मायग्रेन असे म्हटले जाते. यामध्ये पोटात तीव्र वेदना जाणवणं, मुराडा मारणं, थकवा, उलटीचा त्रास जाणवतो.  


धोका कोणाला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटातील मायग्रेनचा त्रास हा प्रामुख्याने अनुवंशिक असतो. सर्वाधिक हा त्रास लहान मुलांमध्ये आढळतो. आई-वडीलांना मायग्रेनचा त्रास असल्यास मुलांमध्येही हा त्रास वाढतो. मुलींना हा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. लहान मुलांमध्ये अ‍ॅबडॉमिनल मायग्रेनचा त्रास असेल तर मोठेपणी मायग्रेनचा त्रास हा डोक्यात वाढण्याची शक्यता असते. 


पोटातील मायग्रेनचं कारण काय? 


पोटात वाढणार्‍या मायग्रेनचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही. मात्र डॉक्टरांच्या मते, शरीरात हिस्टामाइन आणि सेरोटोनिन या हार्मोन्समुळे वेदना वाढतात. नैराश्य किंवा सतत चिंता करण्यामुळे शरीरात मायग्रेनचा त्रास वाढतो. चायनीज फूड, इन्स्टंट नूडल्स यांच्या अतिसेवनामुळे शरीरात मोनोसोडियम ग्लुटामेट, एमएसजी, प्रोसेस्ड मीट, चॉकलेट अतिप्रमाणात खाल्ल्यानेही आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. 


लक्षणं काय? 


पोटात तीव्र वेदना 
पोटाचा भाग पिवळसर दिसणं 
दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवणं 
भूक मंदावणं 
डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसणं  



अनेकदा ही लक्षण सामान्य आणि इतर अनेक आजारांमध्येही दिसणारी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. सुरूवातीपासून ही लक्षण दिसतातच असे नाही. 


पोटातील मायग्रेनचा त्रास अर्धा तासामध्ये ठीक होतो. तर काही जणांना हा त्रास 2-3 दिवस जाणवतो.