सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाताय? `या` पदार्थांचा समावेश नकोच
व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी ब्रेकफास्ट ही लठ्ठपणाची प्रमुख कारणं आहेत.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे लोकांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढताना दिसतंय. वेगाने वाढणार्या वजन आणि पोटाच्या चरबीमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. तर लठ्ठपणा वाढण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे आपला आहार. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या सांगण्यानुसार, स्थूलपणा आणि बेली फॅट केवळ पर्सनॅलिटीवर परिणाम करत नाही तर यामुळे असंख्य आजार देखील मागे लागतात.
व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी ब्रेकफास्ट ही लठ्ठपणाची प्रमुख कारणं आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या ब्रेकफास्टवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. यामध्ये अशा पदार्थांकडे दुर्लक्ष करावं लागेल, ज्यामुळे तुमच्या वजनामध्ये वाढ होते.
प्रोस्टेट फूडपासून दूर रहा
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह म्हणतात की, तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये तळलेल्या गोष्टी खाणं टाळा. कारण ते तुमचं वजन वेगाने वाढवतात. प्रोस्टेट अन्न तयार करताना तेल, मसाले इत्यादींचा उपयोग होतो. या गोष्टी आरोग्यासाठी वाईट आहे. चिप्स, पॉपकॉर्न, ड्राई फ्रूट्स, स्नॅक्स, यांचा प्रोस्टेट फूडच्या श्रेणीत समावेश होतो.
केक आणि कुकीज
सकाळच्या ब्रेकफास्टसाठी केक्स आणि कुकीज खाणं थांबवा. कारण यामध्ये मैदा, साखर आणि सॅचुरेटेड फॅट यांचा समावेश असतो. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा वापर करू नका. अशावेळी तुम्ही फळांचं सेवन करू शकता.
नूडल्सचा समावेश नको
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, काही लोक ब्रेकफास्टमध्ये नूडल्स खातात. यामुळे वजन वेगाने वाढू लागतं. जर तुम्ही देखील असं करत असाल तर सावधान व्हा. कारण नूडल्स देखील मैद्याने बनवलेले असतात. ज्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप कमी असते. हे खूप चवदार जरी असलं तरीही आरोग्याच्या बाबतीतही धोकादायक असतं.
सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये काय खाल्लं पाहिजे?
डॉ. रंजना सिंह म्हणतात की, न्याहारीमध्ये धान्याचा समावेश करावा. धान्यामध्ये पोषक घटक असतात. सकाळच्या नाश्त्यात बाजरी, नाचणी, मका आणि ज्वारी यांच्या पदार्थांचा समावेश करावा.