कानाजवळ छिद्र असणं आरोग्याबाबत कशाचा संकेत देतात?
आपण अनेकदा आपल्याचा शरीराकडे पुरेसे लक्ष देत नाही.
मुंबई : आपण अनेकदा आपल्याचा शरीराकडे पुरेसे लक्ष देत नाही. शरीरावरील काही खुणांवरून तुम्हांला आरोग्याबाबतच काही कळत नकळत संकेत मिळतात. अशांपैकी एक म्हणजे कानाजवळ असलेले छिद्र.
कानाजवळ छिद्र म्हणजे काय ?
काही लोकांच्या कानाच्या वरच्या बाजूला छिद्र असते. कालांतराने काहींमध्ये हे छिद्र मिटून जाते. वैद्यकीय भाषेमध्ये याला प्रीऑरीकुलर साइनस म्हणतात. सुमारे फक्त 10 % लोकांमध्ये हे छिद्र राहते.
का आढळते हे छिद्र?
अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, हे छिद्र मांस आणि त्वचेमध्ये काही दोष निर्माण झाल्याने तयार होते. प्रामुख्याने हे छिद्र कानाच्या बाजूला आढळते. आईच्या गर्भामध्ये बाळाचा योग्यप्रकारे विकास न झाल्यास हे छिद्र निर्माण होते.
कोणामध्ये अधिक छिद्र आढळते ?
दक्षिण कोरिया युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये 9% लोकांमध्ये कानाजवळ हे छिद्र आढळते. तर आशिया आणि आफ्रिकामध्ये सुमारे 10% लोकांमध्ये कानाजवळ छिद्र आढळते.
कानाजवळील छिद्र धोकादायक आहे का?
अमेरिकन नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, कानाजवळील छिद्रामुळे कोणताही धोका नाही. मात्र हे संक्रमित होत नाही तो पर्यंत सुरक्षित आहे. शस्त्रक्रियेच्या मदतीने कानाजवळील छिद्र मिटवता येते. तुमच्या कानाजवळही छिद्र असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.