मुंबई : 'दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे' हे तुम्ही अनेक ठिकाणी वाटलं असतं. मात्र तरीही काही लोक मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आपलं शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसात एकूण 3 पेये पचवू शकतं. परंतु एकापेक्षा जास्त प्रमाणात पेयं पिणं हानिकारक ठरू शकतं. जर एखाद्याला दारू पिऊन आरोग्याचा त्रास होत असेल तर तो दारू पिणे बंद करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर एखाद्याने अचानक दारू पिणं बंद केलं तर काय होतं?


दारू पिणं बंद केल्यावर काय होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तुमच्या शरीराला दीर्घकाळ दारू पिण्याची सवय असेल आणि ती अचानक बंद केली तर शरीराची यंत्रणा बिघडू शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्कोहोल सोडण्याचा योग्य मार्ग सांगतील. 


डेलीस्टारच्या मते, जेव्हा तुम्ही अचानक अल्कोहोल घेणं बंद करता तेव्हा त्याचे परिणाम खाली दिलेले परिणाम दिसू लागतात.


  • डिप्रेशन

  • लक्ष केंद्रित करण्यास अडचण

  • थकवा

  • अस्वस्थता

  • चिडचिड

  • भावनिक होणं

  • उच्च रक्तदाब

  • डोकेदुखी

  • भूक न लागणं

  • घाम येणं

  • निद्रानाश


दारू सोडल्यानंतर शरीर किती काळाने सामान्य होतं?


अहवालानुसार, तुमचं वय, वजन आणि मद्यपानाची सवय तुमचं शरीर किती लवकर योग्य प्रतिसाद देईल यावर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून खूप मद्यपान करत असेल तर अल्कोहोल सोडल्यानंतर त्याचे शरीर सामान्य होण्यास अधिक वेळ लागेल.
 
बहुतेक प्रकरणांमध्ये, शरीराला अल्कोहोलपासून मुक्त होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो. तुम्ही भरपूर दारू प्यायल्यास, ती सोडल्यानंतर तुमच्या शरीराला सामान्य स्थितीत येण्यासाठी काही महिने लागू शकतात.