Relationship tips: तुमचा पार्टनर वुमनायझर तर नाही ना? कसे ओळखाल
Signs of Womenizer in Male: रिलेशनशिपमध्ये अनेक (Relationship Tips) गोष्टींमुळे दुरावा येऊ शकतो त्यातील एक कारण म्हणजे आपल्या पतीचे किंवा पार्टनरचे इतर स्त्रियांसोबतचे शारिरीक संबंध. तेव्हा जाणून घेऊया की नक्की यामागील पुरूषांची (Men) मानसिकता काय असते?
Relationship Tips in Marathi: पुरूषांमधला स्थायीभाव (Male Psychology) काय असतो हे कुठल्याही स्त्रीला तिच्या अंत:प्रेरणेतून (Women Instinct) समजते. आपला पती आपल्याला धोका तर देत नाहीये ना याची चाहूलही स्त्रियांना लागायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे स्त्रियांना मिळालेलं हे एकप्रकारचं गिफ्टचं असतं. त्याचा वापरही त्या चांगल्या पद्धतीनं करून घेतात. परंतु अनेकदा नात्यांमध्ये दूरावा होण्यास आपल्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) किंवा लग्नानंतर आपल्या पतीचे दुसऱ्या स्त्रीशी शारिरीक संबंध (Physical Relationships) कारणीभूत ठरतात. ही बाब अगदी नात तोडण्यापर्यंत म्हणजे घटस्फोटापर्यंत जाऊ शकते परंतु पुरूषांना लग्न झाल्यानंतरही इतर स्त्रियांबद्दल आकर्षण (Attraction Towards Women) का वाटते? लग्नानंतर पुरूष अनेक स्त्रियांशी संबंध का ठेवतात? असे प्रश्नही आपल्याला पडतात. आपल्या आजूबाजूलाही आपण अशी अनेक उदाहरणं दिसतात. स्त्रीलंपटपणा (Womenizer) हा शब्द त्यावरून प्रचलित झाला आहे. (what is a psychology behind womenizer how to recognize your partner know more health news in marathi)
त्यातून हा पुरूषांमध्ये हा स्वभाव असण्याची मानसिक कारणं (Psychology of Womenizer) काय आहेत, हाही चर्चेचा आणि गंभीर विषय आहे. आपला मानवी स्वभाव हा मुळात अभ्यासाचा विषय आहे. मानसशास्त्राच्या नुसार, मानवी मनाचे अनेक पैलू असतात त्यातून आपले लैंगिक जीवनही आपल्या मानसितेशी संबंधित असते. आपल्या मानवी शरीरात अनेक हार्मोनल बदल (Harmonal Changes) होत असतात त्यामुळे त्यानुसारही माणसाचा स्वभाव बदलत जातो. आपल्यालाही आपल्या पार्टनरबद्दलच्या अनेक गोष्टी या खटत असतात. परंतु जेव्हा आपला पती हा दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवत असेल तर त्याचा फटाका नात्यावरही बसणं साहजिकच आहे.
काय आहेत मानसिक कारणं?
यामध्ये एखाद्या व्यक्तीची सामाजिक स्थिती तसेच कौटुंबिक पार्श्वभुमी(Family Background) कशी आहे यावरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. तेव्हा त्यावरही त्यांची मानसिक स्थिती अवलंबून असते.
आपला पार्टनर स्त्रीलंपट आहे हे कसं ओळखाल?
समोर आलेल्या माहितीनुसार असेही कळते की, स्त्रीलंपट व्यक्तीची मानसिकता ही निरोगी असून शकत नाही. त्याच्यामागे मोठा मानसिक तणावही असू शकतो. तुमचा पार्टनर किंवा बॉयफ्रेंड हा इतर महिलांसोबतही शारिरीक संबंध ठेवत असेल तर याचा अर्थ हे इतर स्त्रियांवर असलेले प्रेम नसते. यामध्ये तुमचा पती तुमच्याशी खोटं बोलण्याची अधिक शक्यता असते. यात अनेक प्रकारही असतात. एखादी व्यक्ती जर का तुमच्याकडे आकर्षिक होत असेल तर त्या पुरूषाचे तुमच्यावर प्रेम (Love) नसते तर ती व्यक्ती फक्त तुमचे लक्ष अधिक विचलित करण्याचा प्रयत्न करत असते. ते फक्त तुमच्यासोबतच नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक महिलांसमवेत फ्लर्ट (Filrt) करताना दिसतील.
अशी माणसं ही माहिलांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे वापर करतात. म्हणजेच स्त्रियांना मैत्रीण म्हणून हॉटेलमध्ये घेऊन जातात आणि त्याचे बिल स्वत:चे भरतात. अशी लोकं यापुर्वीही कुणालातरी धोका देऊन मोकळी झालेली असतात. स्त्रीयांची गरजेपेक्षा जास्त काळजी घेत असल्याचे दाखवतात. तसेच त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अशा माणसांपासून लांब राहण्यासाठी वेळीच त्यांच्याविषयीची माहिती काढा आणि त्यांच्या भूतकाळाबद्दलही जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
हेही वाचा - Holi in Bollywood Movies: 'शोले'पासून 'रामलीला'पर्यंत 'या' चित्रपटांतून होतील तुमच्या होळीच्या आठवणी ताज्या
सामजिक कारणं काय असू शकतात?
समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या मनावर लहानपणापासून संस्कार होत असतात. आपण जे पाहतो, जे अनुभवतो त्याचा परिणाम आपल्या मनावरही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होत असतो. त्यातून लहानपणी मनावर होणारे परिणाम हे आपल्या आयुष्यावर परिणाम करू शकतात. येथे लहान वयात पुरूषांच्या आयुष्यात जर आपल्या वडिलांचे इतर स्त्रीशी संबंध असतील, किंवा आईवडिलांचा घटस्फोट (Divorce) झाला असेल अथवा आपले वडिल हे दारूडे असतील तर त्याचा परिणाम हा त्यांच्यावर होऊ शकतो.