Exercise time for weight loss : प्रत्येकजण दररोज चांगलं दिसण्यासाठी काही ना काही करत असतो. चारचौघात उठून दिसणारं व्यक्तीमहत्त्व (Personality) असावं, असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी अनेकजण जीमला (Gym) देखील जातात. मात्र, वजन काही कमी होत नाही. किंचिंत फरक जाणवतो पण शरिराकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. योग्य डाएट फॉलो (Diet Plan For lose weight) केलं जात नाही. त्यामुळे त्याचे उलटसुलट परिणाम दिसून येतात. (what is best time for workout morning vs evening exercise time for weight loss heath tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या व्यक्तीचं वजन पटापट (how to lose weight fast) वाढू शकतं परंतु ते कमी करण्यासाठी भरपूर कसरत (Exercise) करावी लागते. काही नियमित गोष्टी फॉलो केल्या तर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यासाठी योग्य वेळ पाळणं गरजेचं आहे. मात्र, व्यायाम करा.. व्यायाम करा.. असं अनेकजण सांगतात. अरे पण व्यायाम करायचा तरी कधी? व्यायाम करण्याची योग्य वेळ काय?, असा सवाल अनेकांना पडला असेल.


व्यायाम करण्याची योग्य वेळ काय? (Right time to exercise)


सकाळी केलेल्या व्यायामुळे शरीरातील मेटाबॉलिझम रेट वाढतो, यासह अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत होते. परंतु, सकाळच्या व्यायामाच्या (What's a better time to exercise) तुलनेत सायंकाळी केलेल्या व्यायामाचा प्रभाव शरीरात एवढा दिसून येणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात.


सकाळच्या स्लॉटमध्ये चयापचय वाढवणारी जीन्स जास्त असतात. सकाळी लवकर रिकाम्या पोटी व्यायाम (Exercise on an empty stomach) केल्यानं वजन कमी होते, असं दिसून प्रयोगात दिसून आलंय. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी (Water) पिऊन दिवसाची सुरुवात केल्याने त्याचा फायदा सकाळी व्यायामानंतर दिसून येतोय. वजन कमी करताना, कॅलरीयुक्त पदार्थांचे (Caloric foods) सेवन कमी करावं लागतं.


आणखी वाचा - Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!


दरम्यान, फ्रेंच फ्राईज, चॉकलेटी, जॅम-स्टफ्ड, क्रीमी आणि पावडर शुगर कुकीज, पेस्ट्री, डोनट्स आणि केकमध्ये साखर, मीठ, मैदा आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुमचं वजन (how to lose weight naturally) वाढतं. त्याचा परिणाम देखील शरिरावर दिसून येतो.