Rohan Mirchandani Death: एपिगेमिया कंपनीचे संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी निधन झाल्याचे समोर येत आहे. कार्डियक अरेस्टमुळं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कार्डियक अरेस्ट हा अलीकडे चिंतेचा विषय ठरला आहे. पूर्वी फक्त जेष्ठांना हृदयविकाराच्या समस्या जाणवायच्या. मात्र आता  तरुण आणि मध्यमवयीन व्यक्ती सुद्धा या गंभीर आजाराचे शिकार होताना दिसत आहेत. जाणून घ्या, काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणे.


कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्डियक अरेस्ट या आजारामुळे हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या आजारात अचानक हृदयाचे ठोके बंद होऊन मृत्यु होण्याची शक्यता असते. अचानक हृदयाचे ठोके बंद झाल्याने शरीरातील अवयावांमधील रक्त प्रवाहासाठी अडचणी येऊ शकतात. कार्डियक अरेस्टमध्ये वेंट्रिक्युलार फायब्रिलेशन सारख्या एरिथमियामुळे हृदयातील इलेक्ट्रिक सिस्टममध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. अचानक चक्कर येणे, बेशुद्ध होणे आणि पल्स किंवा श्वास बंद होणे ही काही याची सुरुवातीची लक्षणे आहेत. कार्डियक अरेस्ट मध्ये हृदयातील रक्तप्रवाह खंडित होतो म्हणून हा आजार हार्ट अटॅकपेक्षा वेगळा आहे.



तरुणांमध्ये ह्या आजाराची लक्षणे दिसण्याची कारणे


जरी कार्डियक अरेस्ट ह्या आजार तरुणांमध्ये जेष्ठ व्यक्तींपेक्षा कमी प्रमाणात दिसत असला तरीसुद्धा तरुणांमधील ह्या आजाराचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढल्याचे दिसत आहे आणि ही चिंतेची बाब ठरली आहे. हायपरट्ऱॅफिक कार्डियोमायोपॅथी हा एक जेनेटिक आजार असून कार्डियक अरेस्टचा प्रमुख घटक मानला जातो. यामध्ये हृदयाचे स्नायू प्रमाणापेक्षा जाड होतात ज्यामुळे इलेक्ट्रीकल अस्थिरता उद्भवते. लॉन्ग क्यूटी सिंड्रोम तसेच ब्रुगाडा सिंड्रोम सारखे अन्य इनहॅरिटेड आजारसुद्धा तरुणांना हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देतात.



दैनंदिन जीवनशैली आणि वातावरणातील बदल हे सुद्धा कार्डियक अरेस्टचे प्रमुख कारण ठरु शकतात. कोणत्याही ड्रगचे सेवन आणि मद्यपान करण्याव्यतिरीक्त अधिक तणाव, कमी झोप, अनहेल्दी आहार हे हृदयासंबंधी आजारांना कारणीभूत ठरतात.



कसे रहावे कार्डियक अरेस्टपासून दूर?


कार्डियक अरेस्टबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: तरुणांनी या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये कारण हा आजार आता तरुणांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी हेल्दी डाएट घेत रहा तसेच नियमित व्यायामाकडे लक्ष द्या. नेहमी आनंदी रहा आणि ताणतणावापासून दूर रहा.