Cell-based therapy : टाईप 2 मधुमेह ही रक्तातील उच्च साखरेची पातळी दर्शविणारी एक स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. या समस्येचं वेळीच व्यवस्थापन न केल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्यावेळी शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक बनते किंवा रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाही त्यास टाईप २ मधुमेह बोलले जाते. लठ्ठपणा, बैठी जीवनशैली आणि अनुवांशिकतेसारखे घटक मधुमेहाच्या विकासास कारणीभूत ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ प्रदीप महाजन यांच्या माहितीनुसार, अनियंत्रित टाईप २ मधुमेहामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मज्जातंतूंचे नुकसान, मूत्रपिंडासंबंधी समस्या आणि दृष्टीदोष यासह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. उपचारांच्या पारंपारिक पध्दतींमध्ये जीवनशैलीतील बदल, औषधोपचार, इन्सुलिन थेरपी, सेल बेस थेरेपीमधील प्रगती रूग्णांसाठी आशेचा किरण ठरतेय.


हे अत्याधुनिक उपचार मेसेन्कायमल पेशींचा वापर करून मधुमेहाच्या व्यवस्थापन आणि उपचारांमध्ये क्रांती घडवून आणते. स्टेमआरएक्स मेसेन्कायमल पेशींच्या पुनरुत्पादन क्षमतेचा वापर करून टाईप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी एक नवीन दृष्टीकोन मिळवून देते. या पेशींमध्ये शरीरातील विविध पेशी आणि ऊतींमध्ये विकसित होण्याची क्षमता असते. या पेशी रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातून काढल्या जातात, असंही डॉ. महाजन म्हटलंय.


स्टेम आरएक्स चे फायदे कसे होतात?


इन्सुलिन संवेदनशीलता


StemRx उपचाराने शरीरात इंसुलिनची संवेदनशीलता सुधारली जाते. खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या ऊतींची दुरुस्ती करून त्यांना कार्यक्षम करुन, इन्सुलिन-स्रावित पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन, रक्तातील साखरेची पातळी अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.


दाह कमी होणे


जुनाट दाह मधुमेह प्रकार 2 आणि त्याच्या गुंतागुंतांशी जवळून संबंधित आहे. स्टेम आरएक्स थेरपीने स्वादुपिंड यासह विविध अवयवांमध्ये जळजळ कमी करण्याची क्षमता दर्शविली आहे. असे केल्याने, रोगाच्या विकासास आणि प्रगतीमध्ये योगदान देणारे अंतर्निहित घटक कमी करण्यास मदत होऊ शकते.


चयापचय कार्यात सुधार


स्टेमआरएक्स उपचाराने टाईप २ मधुमेह रुग्णांमध्ये एकूण चयापचय कार्य सुधारण्याची क्षमता दर्शविली आहे. यामुळे वजन कमी होऊ शकते, ऊर्जेची पातळी वाढू शकते आणि उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल पातळी यांसारख्या संबंधित परिस्थितींच्या व्यवस्थापन मदत होऊ शकते.


औषधोपचारांमध्ये घट


स्टेमआरएक्स थेरपी टाईप २ मधुमेह व्यवस्थापनासाठी औषधावरील अवलंबून राहण्याचे  प्रमाण कमी करते. उपचार रोगाच्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रीत करत असल्याने, रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी तोंडावाटे घेण्यात येणारी औषधे किंवा इन्सुलिन इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते.


स्टेमआरएक्स उपचार पध्दती ही टाईप २ मधुमेहाचे व्यवस्थापन आणि उपचारांमध्ये एक महत्त्वपूर्ण ठरते. मेसेन्कायमल पेशींच्या पुनरुत्पादक क्षमतेचा उपयोग करून,  खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती करणे, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवणे, जळजळ कमी करणे आणि चयापचय कार्य सुधारले जाते. स्टेआरएक्स टाईप 2 प्रकारातील मधुमेहींच्या रूग्णांच्या जीवनात बदल घडवून आणते तसेच त्यांचे औषधांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण देखील कमी करते.