Sprouts Benefits: आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आणि फायदेशीर असलेल्या पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारात करतो. शरीराच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी गुणधर्म असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याकडे लोक अधिक लक्ष देतात. अशात, तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करतात. मोड आलेली कडधान्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. खास करुन नाश्यात मोड आलेली कडधान्ये खाल्ली जातात. मोड आलेल्या कडधान्यांचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले जाते. काही लोक कच्ची कडधान्ये खातात, तर काही लोक मोड आलेली कडधान्ये उकडून खाणं पसंत करतात. वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केल्याचे विविध फायदे आहेत. 


कच्च्या कडधान्यांचे सेवन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणाच पोषकत्त्वे असतात. अशा प्रकारच्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये एंझाइम्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन केल्याने आपल्याला अधिक प्रमाणात ऊर्जा, फायबर आणि प्रोटीन मिळते. कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह एंझाइम्स असतात जे पचनक्रियेत मदत करतात. कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांमधील घटक हे शरीराच्या स्वास्थ्यासाठी अधिक फायदेशीर ठरले आहेत. कच्च्या स्प्राउट्स मध्ये कॅलरीचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे शरीराचे वजन करण्यासाठी अशा प्रकारच्या कडधान्यांचे सेवन हे अधिक उपयुक्त मानले गेले आहेत. 


उकडलेल्या कडधान्यांचे सेवन


मोड आलेली कडधान्ये ही उकडून खाल्याने पचनक्रिया सुधरण्यास मदत होते. काही लोकांची पचनशक्ती ही कमकुवत असते आणि अशा परिस्थितीत उकडलेली मोड आलेली कडधान्ये ही पचण्यास हलकी असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अधिक उपयुक्त मानली जातात. मोड आलेली कडधान्ये ही उकडल्यामुळे त्यातील अ‍ॅंटी-न्यूट्रिएंट्स नष्ट होतात, परिणामी शरीराला अधिक प्रमाणात पोषकत्त्वे प्राप्त होतात. कधीकधी कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन केल्याने पोटात सूज, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात. कडधान्यांना उकडल्यामुळे अशा समस्यांचा धोका कमी होतो. 


हे ही वाचा: सेंद्रिय की प्रक्रिया केलेले अन्न?: आहारासाठी कोणते योग्य? जाणून घ्या उत्तर


 


 


काय आहे अधिक फायदेशीर?


कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन केल्याने शरीराला अधिक प्रमाणात पोषकत्त्वे मिळतात. परंतु, पचनक्षमता कमी असलेल्यांसाठी मोड आलेली कडधान्ये ही उकडून खाल्याने त्याचा अधिक फायदा होतो. मोड आलेल्या कडधान्यांमधील बॅक्टेरियाचे संक्रमण थांबण्यासाठी ती उकडणे हा आरोग्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. उकडलेली मोड आलेली कडधान्यांमधून सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात पोषकत्त्वे मिळतात. आपापल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार, तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करु शकता.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)