ह्रदयविकाराचा झटका आल्यास काय काळजी घ्याल
तणाव, थकवा, नैराश्य इत्यादी समस्या सध्या आयुष्यातील एक भाग झाल्या आहेत.
मुंबई : कामाचा वाढता ताण, दैनंदिन जीवनशैलीला मिळालेली असामान्य गती या साऱ्याचे थेट परिणाम हे आरोग्यावर होत आहेत. त्यातच सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे हृदयविकार..... तणाव, थकवा, नैराश्य इत्यादी समस्या सध्या आयुष्यातील एक भाग झाल्या आहेत. सध्याच्या युगात अल्कोहोल हे फॅशन मानले जाते. परंतु धुम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयाला नुकसान पोहोचत असल्याचे समोर येत आहे. दररोज हजारो लोक ह्रदय विकाराच्या झटक्याने दगावतात. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.
- हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला उलटी किंवा मळमळ आल्यासारखी वाटते. अशातच रुग्णाला एका बाजूने वळवून उलटी करण्यास लावा. असे केल्यास फुप्फुसांना नुकसान होणार नाही.
- रुग्णाच्या मानेच्या बाजूने हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर पल्स ६०-७० पेक्षा कमी आहे, तर समजून घ्या की रक्तदाब गतीने वाढत आहे आणि रुग्णाची तब्येत नाजूक आहे.
- पल्स रेट जर कमी-जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. त्यामुळे पायाचा रक्तप्रवाह हृदयाच्या बाजुने सुरू होईल आणि रुग्णाला आराम मिळेल.
- रुग्णाभोवती बसू नका. त्याच्या भोवतालची हवा खेळती राहुद्या, त्यामुळे त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळेल. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.