...आणि महिला Inners वापरू लागल्या; प्रत्येकानं वाचावी इतकी महत्त्वाची बातमी
अश्लील नव्हे, Interesting आहे ही माहिती... एकदा पाहाच
मुंबई : मानवाच्या उत्क्रांतीविषयी सांगावं तर अनेक हजार वर्षे मागे जावं लागेल. हा तोच काळ होता, जेव्हा महिला आणि पुरुषांच्या आयुष्यात आधुनिक क्रांतीचा सुगावाही लागलेला नव्हता. एकाएकी मानवाच्या उत्क्रांतीपर्यंत जाण्याचं कारण ठरत आहे, ते म्हणजे एक अशी माहिती ज्याविषयी महिला तर खुलेपणानं बोलतात. पण, पुरुष मंडळींना मात्र काहीसा संकोच वाटतो. ही माहिती आहे, महिलांच्या अंतर्वस्त्रांविषयी Bra विषयी. (when woman started wearing underarments bra know details)
काय आहे ब्राचा इतिहास? (History of bra)
ब्रा घालणं योग्य की अयोग्य याविषयी बरीच मतमतांतरं आतापर्यंत झाली आहेत. अनेकांच्या मते ब्रा घालू नये. पण काही अभ्यासकांच्या मते यामुळं पाठीच्या कण्याच्या अनेक समस्या दूर होतात.
इतिहास काय सांगतो?
तुम्हाला माहितीये का, ब्रा कधीपासून वापरली जाऊ लागली? तर, तुम्हाला साधारण 500 वर्षे मागे जावं लागेल. हा तो काळ होता जेव्हा महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या नावात आणि ठेवणीत बदल झाला होता. हल्ली महिला पॅडेड, कफ्स, वायर्ड अशा विविध प्रकारच्या ब्रा वापरतात. पण, प्राचीन काळात इजिप्तमधील महिला चामड्यापासून तयार करण्यास आलेल्या bra वापरत होत्या.
भारतात याच्या इतिहासाविषयी सांगावं तर, इथं सुरुवातीला महिला ब्लाऊजचा वापर करत होत्या. याची सुरुवात इसवीसन पूर्व 6 व्या शतकापासून झाली होती. हर्षवर्धनाच्या काळात चोळीपासून ही सुरुवात झाली होती.
कॉर्सेट म्हणजे काय?
12 आणि 19 व्या शतकात धातुपासून तयार करण्यात आलेल्या कॉर्सेटचा वापर महिलांकडून करण्यात आला होता. कमरेपासून स्तनांपर्यंतच्या शरीराच्या भागावर ते घालण्यात येत होतं. पण, धातूपासून तयार करण्यात आलेलं हे आवरण शरीरावर घेऊन वावरणं अवघड होतं. कॉर्सेट फारसं यशस्वी ठरलं नाही, कारण यामध्ये महिलांना घाबरल्यासारखं वाटणं, पोट दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं असे त्रास सुरु झाले होते. 1900 पासून त्याचा वापर जवळपास बंद झाला.
... आणि मॉडर्न ब्रा वापरण्यास सुरुवात झाली
काही अहवालांनुसार मॉडर्न ब्रा फ्रान्समध्ये तयार करण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा brassiere असा उल्लेख केला जात होता. फ्रेंच भाषेत याचा अर्थ शरीराच्या वरील भाग, असा होतो. 30 मे 1869 मध्ये फ्रान्समधील हर्मिनी कैडोलनं कॉर्सेटचे दोन तुकडे कापून त्यापासून Undergarment तयार करण्यात आलं. जॉर्ज असं त्या कॉर्सेटचं नाव. पुढे याच कॉर्सेटच्या वरील भाग ब्रा म्हणून वापरला जाऊ लागला.
पाहता पाहता चित्रपटांच्या विश्वात 1915 ते 20 च्या दरम्यान सेमी कप आणि कप ब्रा वापरल्या जाऊ लागल्या. 1940 च्या सुमारास बाजारातही त्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. 1975 पासून यामध्ये आणखी एका प्रकाराची भर पडली, तो म्हणजे स्पोर्ट्स ब्रा.
अधिक वाचा : Weight Loss:वाढत्या वजनाने हैराण ? पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फॉलो करा Tips
Bra ला का होता विरोध?
1960 मध्ये वोग या जगप्रसिद्ध मासिकानं Brassiere ला पाठिंबा दिला होता. पण, त्यांनाही कडाडून विरोध झाला. अनेक महिलावादी संघटनांनी यापासून होणारे तोटे अधोरेखित करण्यास सुरुवात केली. काहींनी तर आंदोलनंही केली. ब्रा वापरल्यामुळं महिलांकडे अश्लील नजरेतून पाहिलं जातं याकडे काहींनी लक्ष वेधलं तर काहींनी यामुळं स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) होतो याकडे लक्ष वेधलं होतं.