मुंबई : पूर्ण देश कोरोना संसर्गामुळे प्रभावित झाला आहे. दुसऱ्या लाटेच्या संसर्गापासून स्वतःला वाचवण्यासाठी आतापर्यंतचा सर्वांत महत्वाचा उपाय म्हणजेच मास्क होय. तसेच सोशल डिस्टंन्सिंग आणि हॅंडवॉशसुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे मास्क बाबत तज्ज्ञांकडून अनेक सल्ले दिले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्जिकल मास्क, फॅब्रिक मास्क सोबतच आता डबल मास्क बाबत अनेक मतं तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की, मास्क उत्तम क्वॉलिटीचे आणि तोंडाला लावणे अनिवार्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ने एक ट्वीट करून सर्जिकल मास्क आण फॅब्रिक मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंन्टोल अँड प्रिवेंशनने डबल मास्क प्रोटेक्शन बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.


जागतिक आऱोग्य संघटनेने मेडिकल-सर्जिकल आणि फॅब्रिक मास्कच्या वापराबाबत महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.


सर्जिकल मास्क कधी वापरावा?


- आरोग्य कर्मचारी, कोव्हिड19चे लक्षणं असलेले रुग्णांची देखभाल करणाऱ्या लोकांनी वापर करावा


- ज्या परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. तसेच 1 मीटर सोशलडिस्टंन्सिंगचे पालन करणे शक्य नाही. अशा ठिकाणच्या व्यक्तींनी वापर करावा.


फॅब्रिक मास्क कधी वापरावा?


- ज्या लोकांना कोव्हिड19चे लक्षणं नाहीत. किंवा या संसर्गाने ते बाधित नाही. अशा लोकांनी फॅब्रिक मास्कचा वापर करावा. 


- सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणारे, ऑफिसमध्ये काम करणारे, भाजीपाला आणि इतर गर्दीच्या ठिकाणी विक्रीचे काम करणाऱ्या लोकांनी फॅब्रिक मास्कचा वापर करायला हवा.



डबल मास्क कधी वापरावा?


डबल मास्कच्या वापराने कोव्हिड 19 च्या संसर्गाचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो. अशातच तुम्ही गर्दीच्या जगाी तसेच एअरपोर्ट, ट्रेन, बस अशा ठिकाणी जा - ये करीत असाल तर डबल मास्कचा नक्की वापर करा.


अशावेळी सर्जिकल मास्कच्या वर कपड्याचा मास्क वापरा. किंवा N95 मास्कचा वापर केला तर डबल मास्कची गरज पडत नाही.