Chicken खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
चिकन खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काही खास उपाय निवडू शकता.
Which chicken is good for health Know the opinion of experts: जगभरात लोकं चिकन खाणं पसंत करतात. भारतातही मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. चिकन स्वस्त आणि त्यात फॅट्सचं प्रमाण कमी असल्याने पसंती दिली जाते. चिकनमध्ये सर्वाधिक प्रोटीन, विटामिन आणि मिनरल असतं. यात मोनो सॅच्युरेडेट फॅट असल्यानं हृदयविकार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र असं असलं तरी चिकन बाबत लोकांमध्ये काही संभ्रम आहेत. चरबीयुक्त चिकन चांगलं की चरबी नसलेलं, असा प्रश्न उपस्थित केला जातो. चिकनच्या चरबीत 32 टक्के फॅट्स असतात, असं आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या माहितीत अर्जेंटिनातील मीट इंफोर्मेशन सेंटरच्या न्युट्रिशनिस्ट मारिया डोलोरेस फर्नांडिस पेजोस यांनी सांगितलं की, "चरबीत फॅट्सपैकी दोन तृतीयांश भाग अनसॅच्युरेटेट असतो. अनसॅच्युरेटेड फॅट्स चांगलं असतं. यात शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. पण याच चरबीमध्ये एक तृतीयांश भाग वाईट फॅट्स असतात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते."
"चरबीयुक्त चिकन खाल्ल्याने कॅलरीजचं प्रमाण दुप्पट होतं.", असं पेजोस यांनी सांगितलं. म्हणून चिकन चरबी काढून खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकन एकदा फ्रीजमधून काढलं की पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवू नका. कारण त्यात सुक्ष्मजीव तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे चिकन शिजवायचं असेल तेव्हाच फ्रीजरमधून काढा.
चिकनमध्ये पोषक घटक आढळतात
- प्रथिने - 27.07 ग्रॅम
- कोलेस्टेरॉल - 87 मिग्रॅ
- चरबी - 13.5 ग्रॅम
- कॅलरीज - 237 मिग्रॅ
- कॅल्शियम - 15 मिग्रॅ
- सोडियम 404 मिग्रॅ
- व्हिटॅमिन ए - 160 मायक्रोग्राम
- लोह - 1.25 मिग्रॅ
- पोटॅशियम - 221 मिग्रॅ
चिकनच्या या पाककृतींमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील
चिकन खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काही खास रिसेपी निवडू शकता. चिकन सूप, कमी तेलात बनवलेले चिकन तंदुरी, कोळशावर शिजवलेले चिकन कबाब, या सर्व खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि बटरचा वापर फारच कमी असल्याने आरोग्याला फारशी हानी होत नाही.
(Disclaimer: कृपया अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)