मुंबई : चहा हे भारतातील सगळ्यांचे आवडीचे पेय आहे. सकाळी उठल्याबरोबर लोक चहाने आपल्या दिवसाची सुरूवात करतात. कारण, चहा पिणे हा आपल्या सकाळच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. एखाद्या व्यक्तीची सकाळची चहा मिस झाली की, त्याला चूकल्या चूकल्यासारखे वाटते. त्यामुळे बहुतांश लोकं चहाने आपल्या दिवसाची सुरूवात करतात. चहा पिण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही डोळे उघडताच चहा पितात, जसे की, ते बेडटी घेतात, तर काही लोक हे फ्रेश झाल्यावर चहा पितात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोकांना चहा इतका आवडतो की, ते सकाळीच जास्त चहा बनवतात आणि ते गरम करत संध्याकाळपर्यंत गरम करुन पित असतात.


पण तुम्हाला माहित आहे का की? पुन्हा पुन्हा चहा गरम करुन पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. ज्यामुळे तुम्हाला शरीराच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गरम चहा प्यायल्याने किंवा जास्त चहा पिण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.


पुन्हा पुन्हा चहा गरम करण्याचे तोटे


तज्ञांच्या मते, जेव्हा आपण चहा पुन्हा गरम करतो, तेव्हा त्याच्या चवीबरोबरच त्याचा सुगंधही कमी होतो. त्याच वेळी, या काळात चहाचे पोषण किंवा त्याच्यातील घटक कमी होऊ लागतात. तज्ञ असेही मानतात की, चहा पुन्हा गरम करण्याचा दुसरा तोटा म्हणजे दीर्घकाळ ठेवलेल्या चहामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ सुरू होते. ज्यामुळे अशी चहा पिणे पोटासाठी धोकादायक ठरू शकते.


यामुळे पोटदुखी, ओटीपोटात दुखणे किंवा जळजळ होण्याच्या तक्रारी होऊ शकतात. हर्बल चहाच्या बाबतीत ही तसेच आहे, असी चहा पुन्हा गरम करुन प्यायल्याने तिच समस्या उद्भभवू शकते.


जास्त चहा पिण्याचे तोटे


चहामध्ये असलेले टॅनिन शरीरातील लोहाचे शोषण करु लागतात. ज्यामुळे शरीराला पुरेसे लोह मिळत नाही. तसेच जास्त चहा प्यायल्याने आतड्यांवर देखील याचा वाईट परिणाम होतो. यासह, असामान्य हृदयाचे ठोके, हृदयरोग, लठ्ठपणा, अॅसिडीटीचा धोका देखील वाढतो.


(वरील माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. हे केवळ लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने दिला गेला आहे.)