WHO New Guideline for Premature Babies: भारत हा असा देश आहे, जिथे दरवर्षी जगाच्या तुलनेत अकाली जन्मलेल्या शिशुंची मृत्यूसंख्या जास्त आहे. याची कारणे अनेक आहेत, गर्भधारणेनंतर मातेला योग्य पोषण न मिळणे, गर्भधारणेनंतरही मातेने वजनदार कामे करणे, मुदतपूर्व बाळाचा जन्म झाल्यानंतर रुग्णालयात आधुनिक तांत्रिक यंत्रणेचा अभाव, इत्यादी. याशिवाय काही अकाली बाळ फक्त एक महिना जगू शकतात. याचपार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुदतपूर्व (Premature Babies) (गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी) किंवा लहान (जन्माच्या वेळी 2.5 किलोपेक्षा कमी) नवजात बाळांसाठी जगण्याची आणि आरोग्याचे परिणाम सुधारण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांगारू मदर केअर म्हणजे काय? 


कांगारू मदर केअर (KMC) या पद्धतीत मुदतपूर्व प्रसूती झालेली किंवा कमी वजन असलेली बाळे आईकडेच असतात. यामुळे बाळाला ऊब, पोषण आणि स्वच्छता मिळेल याची खातरजमा केली जाते.


यावर डब्ल्यूएचओने सांगितले की, बाळ जन्म वेळेच्या आधी झाल्यामुळे त्यांचे वजन कमी असते, त्या बाळांसाठी कांगारू केअरचा उपयोग केला जातो. या तंत्रामध्ये मुलाला पालकांच्या उघडया छातीवर चिकटवून ठेवले जाते, ज्यामुळे बाळाच्या त्वचेचा थेट पालकांच्या त्वचेशी संपर्क होतो, जे अतिशय प्रभावी तसेच वापरण्यासही सोपे होत असते आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते. हे तंत्र वेळेआधी किंवा मुदतीनंतर जन्मलेल्या सर्व बाळांची चांगली काळजी घेण्यासाठी फायदेशीर आहे.


मुदतपूर्व बाळांना अधिक काळजी घेणे आवश्यक 


डब्ल्यूएचओचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम यांच्या मते, मुदतपूर्व जन्मलेली बाळे जगू शकतात परंतु प्रत्येक मुलाला ती संधी देणे आवश्यक आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे दर्शवतात की या लहान मुलांसाठी परिणाम सुधारणे हे नेहमीच सर्वात उच्च-तंत्र समाधान प्रदान करणे नाही, परंतु कुटुंबांच्या गरजा केंद्रीत आवश्यक आरोग्य सेवेचा प्रवेश सुनिश्चित करणे.


वाचा :  ATM मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी वाचा; नाहीतर तुमचे पैसे अडकतील! 


दरवर्षी सुमारे 15 दशलक्ष बाळांचा जन्म वेळेपूर्वी होतो


आकडेवारीवर नजर टाकल्यास, दरवर्षी सुमारे 15 दशलक्ष बाळे वेळेपूर्वी जन्माला येतात. जे जागतिक स्तरावरील सर्व जन्मांपैकी 10 पैकी 1 पेक्षा जास्त आहे, आणि त्याहूनही जास्त संख्या - 20 दशलक्षाहून अधिक बाळ कमी वजनाने जन्माला येतात. यूएन एजन्सीने म्हटले आहे की संख्या वाढत आहे आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अकालीपणा हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 


कांगारू केअरचे फायदे


* त्वचेपासून त्वचेचा संपर्क झाल्यामुळे मेंदूच्या विकासास आणि भावनिक संबंधांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते, डोळयांचा डोळयांशी संपर्क होत असल्यामुळे प्रेम, आपलेपणा आणि विश्वास यामुळे सामाजिक प्रतिभा ही विकसित होण्यास मदत मिळते.


* या तंत्राचा वापर स्तनपानास प्रोत्साहन देते. हे मूल आणि आई दोघांच्याही आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याशिवाय बाळाच्या पोषण आणि विकासामध्ये स्तनपानाचे योगदान महत्त्वाचे आहे.


* हिवाळयात कमी वजनाच्या बाळाच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवले जाते.


* या तंत्रज्ञानाने काळजी घेतल्या गेलेल्या बालकांचे वजन चांगले वाढते, ते जास्त काळ शांतपणे झोपतात, जागल्यावरही शांत राहतात आणि कमी रडतात.


त्यामुळे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ आणि डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की सर्व मुलांसाठी कांगारू केअर तंत्राचा वापर करावा जेणेकरून त्यांचा योग्य विकास होईल.