WHO ने एमपॉक्सला वर्ल्ड हेल्थ इमरजन्सी म्हणून घोषित केलं आहे. मंकीपॉक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामारीला एमपॉक्स नावानेही संबोधलं जातं. 13 देशांमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या या महामारीमुळे आतापर्यंत 524 लोकांचा मृ्त्यू झाला आहे. तर 14,000 लोकांना याची लागण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या तीन वर्षात दुसऱ्यांदा मंकीपॉक्सला आप्तकालीन महामारी म्हणून घोषित केलं आहे. 2022 मध्ये मंकीपॉक्स जागतिक आप्तकालीन परिस्थिती घोषित केली आहे. त्यावेळी जगात 116 देशांमध्ये एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली होती. आणि 200 लोकांचा मृत्यू झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे मंकीपॉक्समुळे महिला आणि 15 वर्षांहून लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. 


या देशात मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण 



आफ्रिकेच्या कांगोस बुरुंडी, केन्या, रवांडा आणि युगांडासह अनेक देशांमध्ये Mpox चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराने आता महामारीचे रुप धारण केले आहे. मंकीपॉक्सपासून बचाव करणाऱ्या लसीकरणाचा तुटवडा देखील जाणवत आहे. 


काय आहे मंकीपॉक्स? 


मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे जो माकडांपासून मानवांमध्ये पसरतो. या विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडेही होतो. संरक्षणाशिवाय शारीरिक संबंध ठेवल्यानेही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा प्रसार होतो. मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर, ताप येतो आणि पुरळ उठतात जे संपूर्ण शरीरात पसरतात. सुरुवातीला पुरळ चेहऱ्यावर दिसते आणि नंतर संपूर्ण शरीरावर पसरते. मंकीपॉक्सची अधिक प्रकरणे समलैंगिक पुरुषांमध्ये आढळतात. या विषाणूची सुरुवातही आफ्रिकेतून झाली.


मंकीपॉक्सची लक्षणे? 


Mpox हे एक व्हायरल संक्रमण आहे. मंकीपॉक्सबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यावर हा आजार झपाट्याने पसरतो. मंकीपॉक्समध्ये हलका ताप आणि शरीरावर पाण्याने भरलेलं फोड ही त्याची लक्षणे आहेत. यामध्ये डोकेदुखी, अंगदुखी सारख्या समस्या देखील जाणवतात.  


WHO ची माहिती 


डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी एमपॉक्स वाढीवर IHR आपत्कालीन समितीच्या बैठकीनंतर मीडिया ब्रीफिंग दिली. एमपॉक्स आणीबाणीच्या स्थितीत पोहोचण्याची तीन वर्षांत ही दुसरी वेळ असल्याचे ते म्हणाले. 
आफ्रिकेमध्ये मंकीपॉक्सचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजूबाजूच्या देशातही याची वाढ झपाट्याने होत आहे. 


या महामारीवर उपाय नाही 


मंकीपॉक्सने संक्रमित असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. लक्षणांच्या आधारावर रुग्णावर उपचार केले जातात. मात्र अद्याप या आजारावर कोणतंही औषध नाही आणि लस देखील नाही. त्यामुळे रुग्णाची लक्षणे पाहून उपाय केले जातात.