Omicron Variant: ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका... WHO चा गंभीर इशारा
जगभरात हातपाय पसरलेल्या ओमायक्रॉनने भारतातही कहर केला आहे
Omicron Variant Update : जगातल्या अनेक देशांमध्ये हातपाय पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) भारतातही कहर केला आहे. देशात ओमायक्रॉनची सुमारे तीन हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमिक्रॉनसोबतच कोरोना संसर्गानेही वेग घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron बाबत इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे, नवीन आणि घातक प्रकारांचा सामना करावा लागू शकतो. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवूड यांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका
WHO अधिकाऱ्याने Omicron हलक्यात न घेण्याचं बजावलं आहे. सर्दी, खोकला हा सामान्य आजार मानण्याची चूक करू नका. ओमायक्रॉन डेल्टा इतका प्राणघातक नसला तरी सावधगिरीची आवश्यकता आहे. ओमायक्रॉन जेवढा अधिक पसरत आहे, तेवढा तो अधिक वेगाने बदलूही शकतो. त्यातून नव्या व्हेरिएंटचा जन्म होण्याची शक्यता जास्त आहे, असं WHO च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत Omicron 128 देशांमध्ये पसरला आहे.
14 दिवस क्वारंटाईनचा सल्ला
WHO ने कोविड रुग्णांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये (Quarantine) राहण्याचा सल्ला दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कमी संसर्ग असलेल्या देशांमध्ये जास्त काळ क्वारंटाईन ठेवल्याने कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास मदत होऊ शकते. होते.
ब्रिटनमध्ये दोन लाखांहून अधिक प्रकरणे
युरोपात ओमायक्रॉनने थैमान घातलं आहे . ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत दोन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. इटलीमध्ये एका दिवसात 1,70,844 प्रकरणांची नोंद झाली आहे. इटलीमध्ये २५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.