डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं माहिती आहे? नसेल तर जाणून घ्या
डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं औषध नेमकं कोणतं आहे? हे आपल्याला कळत नाही.
Knowledge News: आयुष्यात कधीतरी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येतेच. सर्दी, ताप, साथीचे आजार यासाठी कधी ना कधी डॉक्टरांची भेट होते. लवकर आराम पडावा यासाठी डॉक्टर काही औषधं लिहून देतात. अनेकदा प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं औषध नेमकं कोणतं आहे? हे आपल्याला कळत नाही. पण मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शन घेऊन गेल्यानंतर विक्रेता बरोबर तिचं औषधं काढून देतो. या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात त्या सर्वसामान्यांना समजत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शॉर्ट फॉर्मबद्दल सांगत आहोत. डॉक्टर प्रथम त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx लिहून देतात. तुम्हाला त्याचा अर्थ काय माहित आहे? जर नसेल तर जाणून घ्या.
RX चा अर्थ काय आहे?
प्रिस्क्रिप्शनवर डाव्या बाजूला लिहिलेला Rx म्हणजे 'Recipe'. हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ 'To Take' असा होतो. म्हणजेच Rx च्या प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टर जे काही देतात, ते रुग्णाला घेण्याचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवर Rx लिहून देतात तेव्हा ते अधिक काळजी घेण्यास सांगतात. त्यावर डॉक्टर काही गोष्टी लिहितात, ज्याचे पूर्ण पालन रुग्णाला करावे लागते.
प्रिस्क्रिप्शनवर अजूनही शॉर्टफॉर्म असतात
प्रिस्क्रिप्शनमध्ये Rx व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे कोड-वर्ड वापरले जातात हे तुम्ही पाहिलेच असेल. उदाहरणार्थ, कोणत्याही औषधासोबत Amp लिहिले असेल तर याचा अर्थ असा होतो की, हे औषध रात्रीच्या जेवणापूर्वी घ्यावे लागेल. दुसरीकडे, जर AQ लिहिले असेल तर याचा अर्थ असा होतो की ते पाण्यासोबत घ्यावे लागेल. औषधासोबत BID लिहिणे म्हणजे ते औषध दिवसातून दोनदा घ्यावे लागेल.
कधीकधी औषधे लिहून देण्यासाठी शॉर्ट-फॉर्म देखील वापरले जातात. उदाहरणार्थ, BCP गर्भनिरोधक गोळीसाठी वापरला जातो आणि ASA एस्प्रिनसाठी वापरला जातो. त्याच वेळी, याशिवाय, कानाच्या ड्रॉपसाठी AU सारखा शॉर्ट फॉर्म वापरला जातो, म्हणजे ड्रॉप दोन्ही कानात टाकावा लागेल.
आरोग्यविषयक चाचण्यांसाठी देखील शॉर्टफॉर्म वापरले जातात. जसे छातीच्या एक्स-रेसाठी CXR आणि हृदयाशी संबंधित आजारासाठी CV वापरलं जातं. त्याच वेळी, CBC चा वापर संपूर्ण रक्त तपासणीसाठी केला जातो आणि त्याचप्रकारे Garg शॉर्ट-फॉर्मचा वापर स्वच्छ धुण्यासाठी किंवा गार्गल करण्यासाठी केला जातो. यापुढे कधी तुमच्यावर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली तर शॉर्टफॉर्म जरूर वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या.