Eating Leftover Rice Can Be Dangerous: जेवण हे जितकं ताजं असेल तितकं ते पौष्टीक असं आहारशास्त्र म्हणतं. भारतामध्येही प्राचीन काळापासून ताज्या भोजनाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांकडूनही अनेकदा ताज्या भोजनाचं महत्त्वं सांगितलं जात. अनेक डॉक्टर जेवण केल्यानंतर काही मर्यादीत काळातच त्याचं सेवन करावं असंही सांगतात. फार वेळ ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं. पूर्वीच्या काळी फ्रिज नव्हते. त्यावेळी लोक अन्नपदार्थ हवे तितकेच बनवायचे आणि एका वेळीच ते पदार्थ संपवायचे. तरीही काही उरलं तर ते अन्नपदार्थ गायीला किंवा पाळीव प्राण्यांना खाऊ घालायचे. मात्र फ्रिजचा वापर वाढल्यापासून दुपारी उरलेलं जेवण रात्री आणि रात्री उरलेलं जेवण दुसऱ्या दिवशी नाश्त्याला वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेलं जेवण बाहेर काढून गरम करुन अनेकजण खातात. 


शिळ्या पदार्थांमध्ये निर्माण होतात जंतू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्नपदार्थ काही ठराविक काळानंतर फेकून द्यावं असा सल्ला दिला जातो. मात्र अनेकजण असं करत नाही. अनेक दिवस अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवून गरजेप्रमाणे ते गरम करुन खाल्ले जातात. यामुळे प्रकृतीसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकारही घडतात. बाकी काही नाही तरी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी शिळा भात गरम करुन खाल्ला असेल. पण अशा शिळ्या पदार्थांमध्ये निर्माण होणाऱ्या जंतूंचे व्हिडीओ मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. 


मायक्रोस्कोपखाली काय दिसलं?


यापैकी एक व्हिडीओ हा शिळ्या भाताच्या शितांमध्ये निर्माण होणारे जंतू (बॅक्टेरिया) दिसत आहेत. या व्हिडीओत दिसणारे जंतू हे मायक्रोस्कोप खालीच दिसतात. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळा भाताचं एक शित चिमट्याने उचलताना दिसतो. नंतर ते शित काचपट्टीवर घेऊन त्यावर पाण्याचा एक थेंब टाकतो. नंतर हा पाण्याचा थेंब तो मायक्रोस्कोपखाली पाहतो. त्यावेळेस यामध्ये अनेक जंतू वळवळ करताना दिसत आहे. अनेक जंतू या मायक्रोस्कोपमधून दिसतात. "शिळा भात मायक्रोस्कोपखाली पाहिल्यावर," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.



लोकांची चर्चा


हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर काहींनी जंतू तर प्रत्येक पदार्थांमध्ये असतात असं म्हटलं आहे. काहींनी हा भात अनेक दिवसांपूर्वीचा असू शकतो अशीही शक्यता व्यक्त केली आहे. काहींनी सर्वच जंतू हानीकारक नसतात असं म्हटलं आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल चर्चेवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)