प्रवासादरम्यान तुम्हाला ही होते का मळमळ? मग हा उपाय करा
प्रवास करताना मळमळ होण्याचा त्रास अनेकांना असतो. हा कोणताही आजार नाही. पण ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खाली दिलेले उपाय करु शकता.
मुंबई : अनेकांना कार किंवा बसमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो. अनेक लोकांसाठी ही समस्या गंभीर आहे. अशा लोकांना चक्कर येणे, अस्वस्थता, मळमळ किंवा उलट्या यासारख्या समस्या काही तासांसाठी असतात. याला मोशन सिकनेस म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे फक्त प्रवासादरम्यानच का होते.?
प्रवासात उलट्या का होतात?
प्रवासात उलट्या होणे याला मोशन सिकनेस लक्षणे म्हणतात. लक्षात ठेवा की मोशन सिकनेस हा एक आजार नाही, परंतु ही अशी स्थिती आहे जेव्हा आपल्या मेंदूला कान, डोळे आणि त्वचेतून वेगवेगळे सिग्नल मिळतात. यामध्ये मध्यवर्ती मज्जासंस्था गोंधळून जाते. परंतु जर तुम्ही काही सावधगिरी बाळगली तर मोशन सिकनेसपासून मुक्त होणे खूप सोपे आहे.
मागील सीट टाळा
प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत असेल तर कोणत्याही मोठ्या वाहनाच्या मागील सीटवर बसणे टाळावे. मागच्या सीटवर वेग जास्त जाणवतो. तुम्ही गाडीच्या पुढच्या सीटवर बसा.
पुस्तक वाचू नका
प्रवासात उलट्यांचा त्रास होत असल्यास पुस्तक अजिबात वाचू नका. यामुळे तुमच्या मेंदूला चुकीचा संदेश जातो.
जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर गाडीची खिडकी उघडा. ताजी हवा मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल.
रिकाम्या पोटी प्रवास करू नका
रिकाम्या पोटी प्रवास केल्यास उलट्या होत नाहीत हा समज लोकांमध्ये आहे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेकदा जे लोक काहीही न खाता प्रवासाला निघतात, त्यांना मोशन सिकनेसचे प्रमाण अधिक असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जड आहार घ्या. हलका आणि सकस आहार घेऊनच घर सोडा.
हा उपाय करा
प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असल्यास (Motion Sickness Treatment) घराबाहेर पडण्यापूर्वी काही सोपी तयारी करा. या सोप्या उपायांमुळे तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
1. जेव्हाही तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा एक पिकलेले लिंबू सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला मळमळ वाटत असेल तेव्हा लगेच या लिंबाचा सोलून वास घ्या. याने तुमचे मन फ्रेश होईल आणि असे केल्याने उलट्या होणार नाहीत.
2. लवंगा भाजून एका डब्यात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रवासाला जात असाल तेव्हा सोबत घ्या. उलट्या होत असल्यास चिमूटभर साखर किंवा काळे मीठ टाकून चोखत राहावे.
3. तुळशीची पाने चघळल्याने उलट्या होत नाहीत. याशिवाय लिंबू आणि पुदिन्याचा रस एका बाटलीत काळे मीठ टाकून ठेवा आणि प्रवासादरम्यान ते थोडे-थोडे प्या.
4. लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ शिंपडा आणि चाटून घ्या. याने तुमचे मन ठीक राहील आणि उलट्या होणार नाहीत.
5. जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर तिथे बसण्यापूर्वी एक पेपर टाका आणि मग बसा. यामुळे तुम्हाला उलट्या होणार नाहीत.