मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला. मात्र आता लाटेचा प्रभाव काहीसा कमी झाला असून काही राज्यांमध्ये हळू-हळू अनलॉक करण्यास सुरुवात होतेय. दरम्यान मेडिकल एक्सपर्ट्स आणि डॉक्टर कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना 6 मिनिटांचा वॉक टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या वॉक टेस्ट दरम्यान रूग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची लेवल किती आहे याची माहिती मिळण्यास मदत मिळते. पण हा नेमका वॉक टेस्ट काय असतो जाणूयात.


6 मिनिटांच्या वॉक टेस्टने जाणून घ्या फुफ्फुसांची परिस्थिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संक्रमणाचा तुमच्या फुफ्फुसांवर कसा परिणाम झालाय हे जाणून घेण्यासाठी 6 मिनिटांचा वॉक टेस्ट मदत करतो. कोल्हापूर आणि पुण्यातील आरोग्य विभागाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांसाठी हा 6 मिनिटांचा वॉक टेस्ट अनिवार्य केला होता.  


कसा असतो 6 मिनिटांचा वॉक टेस्ट


डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांसाठी 6 मिनिट वॉक टेस्ट महत्त्वाचा आहे. यासाठी सर्वप्रथम रूग्णाने पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची लेवल तपासावी. त्यानंतर रूग्णाने खोलीमध्ये न थांबता 6 मिनिटं चाललं पाहिजे. 6 मिनिटं चालल्यानंतर Oxygen saturation level तपासावी. ही लेवल 93 टक्क्यांपेक्षा कमी नसावी. चालण्यापूर्वी आणि चालण्यानंतर घेतलेली रिडींग जर 93 टक्क्यांपेक्षा खाली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. 


अनेकदा रूग्णांमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यानंतर देखील लक्षणं दिसून येत नाहीत आणि अचानक परिस्थिती गंभीर होऊन जाते. त्यामुळे 6 मिनिटांची वॉक टेस्ट लक्षणं होण्याच्या 5 दिवसांनंतर ते 12 व्या दिवसांपर्यंत दररोज केला पाहिजे.