मुंबई : सध्या सोशल मीडियावर ब्लॅक वॉटरची (Black Alkaline Drink) जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इतर सेलिब्रेटिही या ब्लॅक वॉटरचं सेवन करतात. या ब्लॅक वॉटरचं सेवन करणं, आरोग्यासाठी लाभदायक आहे. या ब्लॅक वॉटरच्या एक लीटरचा दर हा 4 हजारच्या घरात आहे. ब्लॅक वॉटर आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने अनेक जण याच्या किंमतीकडे दुर्लक्ष करतात. नक्की या ब्लॅक वॉटरचं फायदे काय आणि त्याचा आरोग्याला नेमका काय फायदा होतो, हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी मंडळी जीममध्ये जाते, तसेच आरोग्याबाबत फार सजग असलेल्यांमध्ये  ब्लॅक वॉटर फार प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रेटीज तसेच अनेक क्रीडापटूही या ब्लॅक वाटरला प्राधान्य द्यायला लागले आहेत. हे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच यामधील पीएच लेव्हलमुळे अपचनाचा त्रासही होत नाही.


या ब्लॅक वॉटरला एनर्जी ड्रिंक, स्पोर्ट्स ड्रिंक, फ्यूलविक ड्रिंक आणि हेल्थ ड्रिंक असंही म्हंटलं जातं. डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनुसार, ब्लॅक वॉटर ही संज्ञा एका विशिष्ट प्रकारच्या पाण्यासाठी वापरली जाते. यामध्ये फ्यूलविक एसिड (FvA) असतं. यामध्ये खनिज त्तव आणि व्हिटामिनही असतात.     


आपण जे दररोज पाणी पितो, त्यामधील pH लेव्हल 6.5 ते 7.5 इतकं असते. ही लेव्हल हवामानावरही आधारित असते. पाणीपुरवठा कुठून होतो, पाण्यातील जीवाणू हटवण्यासाठी नेमकं काय केलं जातं यावरही ही लेव्हल अवलंबून असते. तर ब्लॅक वॉटर किंवा एल्कलाईन वॉटरमध्ये आईयोनाइज्ड असतं. जे पूर्णपणे शुद्ध असतं.


तज्ज्ञ काय म्हणतात?  


ब्लॅक वॉटर हे आरोग्यसाठी लाभदायक नसतं, असंही काही तज्ज्ञांच म्हणनं आहे. रविचंद्रन हे 1980 पासून क्लोरिनेशन उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यानुसार ब्लॅक वॉटर आरोग्यसााठी चांगलं आहे. पण त्यांनी असंही नमूद केलं. ब्लॅक वॉटरबाबत जे काही सुरुय ती निव्वळ मार्केटिंग असल्याचं रवीचंद्रन यांनी नमूद केलं.


ब्लॅक वॉटर घेतल्याने तुम्ही आणखी तरुण दिसता, याबाबत कोणताही पुरावा नाही. विराट कोहली ब्लॅक वॉटर पितो ते 4 हजार रुपयाला मिळतं. साधारण पाण्याची एक बाटली 10 ते 20 रुपयांना मिळते.