दिल्ली : कोरोनानंतर कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर आले. तर आता प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की, अजून कोरोनाची नवे व्हेरिएंट दिसू शकतात का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण असूनही, कोविडची प्रकरणं वाढू लागली आहेत. कोरोनाचे नवीन प्रकार येत नसल्याचंही तज्ज्ञ नाकारत नाहीत. तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, व्हायरसचे नवे व्हेरिएंट येऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जोपर्यंत हा विषाणू लोकांना संक्रमित करत राहील तोपर्यंत त्याचे व्हेरिएंट दिसून येतील. परंतु याचा अर्थ असा नाही की नवे व्हेरिएंट येत राहतील किंवा ते अधिक धोकादायक असतील.


तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला अद्याप लस देणं बाकी आहे. त्यामुळे अनेक महिने किंवा वर्षे संसर्ग होण्याचा धोका आहे. जेव्हा विषाणू त्याची कॉपी बनवतो तेव्हा त्यात एक लहान म्यूटेशन होऊ शकतो. ह म्यूटेशन व्हायरसला जगण्यास मदत करतो आणि यामुळे नवीन व्हेरिएंट तयार होऊ शकतात.


अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे विषाणू तज्ज्ञ अँड्र्यू रीड म्हणतात की, जेव्हा विषाणू नवीन प्रजातींना संक्रमित करतो, तेव्हा त्याला आणखी पसरण्यासाठी नव्या होस्टची आवश्यकता असते.


मिशिगन विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ अॅडम लोरिंग म्हणाले की, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते, डेल्टा प्रकार हा विषाणूच्या मागील प्रकारापेक्षा अधिक संक्रामक आहे. हे अजूनही अधिक संसर्गजन्य होण्यासाठी म्यूटेट होऊ शकतो. परंतु त्यात पूर्वीपेक्षा दुप्पट प्रसार दर असू शकत नाही.


तज्ञांचा असा विश्वास आहे की वायरस अधिक प्राणघातक बनू शकतो. परंतु तो जास्त संसर्गजन्य नाही. विषाणूचा येणाऱ्या व्हेरिएंटचं संक्रमण किंवा लसीकरणापासून प्रतिकारशक्तीवर परिणाम करू शकतो का यावर तज्ज्ञ आता लक्ष ठेवून आहेत. फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरमधील व्हायरस तज्ज्ञ डॉ.जोशुआ शिफर म्हणतात की, जसं जसं लोकांचं लसीकरण होतंय, हे शक्य आहे की हा विषाणू कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांद्वारे पसरेल.