Health News: थंडीचा मौसम सुरू झाला आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर आपल्याला (winter season) सर्दी, खोकला, पडसं यांचा त्रास हा होतच असतो. त्यातून आपल्याला अजून एक त्रास सतावतो तो कंबर आणि पाठदूखीचा. तज्ञांच्या मते, हिवाळ्यात (winter season and health) आपलं शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी केवळ निरोगी खाणं आणि रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत ठेवणं पुरसं नाही तर आपल्या स्नायूंची काळजी घेणेही आवश्यक ठरते. अनेकदा कामाच्या गडबडीमुळे आणि ताणताणावामुळे (stress) आपल्याला अनेकदा शारिरीक ताणताणवांचाही सामना करावा लागतो. तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या स्नायूंची काळजी घेणेही बंधनकारक असते. जे लोकं व्यायाम करत नाहीत त्यांना स्नायू दुखीचा त्रास होतो. पण हिवाळ्याच्या मोसमात ही समस्या आणखी वाढते त्यामुळे तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी 'या' काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (winter season back pain remedies at home know more)


गुडघेदुखीपासून मुक्त कसे व्हावे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त असाल तर हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही नियमित चाला. चालण्यानं शरीराचा(walking) चांगला व्यायाम होतो. याशिवाय आरामात स्ट्रेचही करा. यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता सुधारते आणि स्नायूंचा ताणही कमी होण्यास मदत होईल. 


हेही वाचा - Chandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...


पाठदुखी आणि उपाय 


पाठदुखीमुळे तुम्हाला चालायला आणि बसण्यात खूप त्रास होण्यासाची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी (yoga) तुमच्या आसनाची विशेष काळजी घ्या. जड व्यायाम टाळा. ही समस्या दूर करण्यासाठी योगा आणि पोहणे शक्य असल्यास तेही करा. यामुळे तुमच्या स्नायूंची ताकद टिकून राहण्यास मदत होते. जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका आणि प्रत्येक वेळी बॉडी स्ट्रेच करत रहा. असं केल्यानं तुमच्या शरीराला आराम मिळेल. 


घोट्याच्या आणि पायांमध्ये वेदना आणि उपाय काय करावेत? 


बसताना आणि चालताना पाय आणि घोट्यांवर नेहमी दबाव असतो. यामुळे हाडे (bones) आणि अस्थिबंधन देखील खराब होतात. म्हणूनच नेहमी योग्य मुद्रेत बसा आणि पायांवर दबाव आणणारी कामे करणे टाळा.


मनगट आणि हात दुखणे आणि उपाय


मनगट आणि हात दुखत असल्यास, उभे, बसणे आणि चालताना खांदे आरामशीर (body streching) स्थितीत ठेवा. कामाच्या दरम्यान थोडा ब्रेक घ्या आणि कधीही एका हाताने कीबोर्ड वापरू नका. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)