मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की आहारामध्ये आणि परिणामी सौंदर्यामध्येही अनेक बदल होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहरा शुष्क होण्याचे प्रमाण अधिक होते. मग त्याला तजेला देण्यासाठी मॉईश्चरायझर क्रीम आणि इतर ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. यामुळे अनेकदा चेहरा काळंवडतो. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना या चूका करणं टाळा.  


पिलिंग - 


त्वचा एक्सफ्लोइट करण्यासाठी, त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवण्यासाठी अनेकदा पिलिंगची मदत घेतली जाते. मात्र हिवाळ्याच्या दिवसात अशाप्रकारच्या ट्रीटमेंट मदत करत नाहीत. उलट यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ऑईल काढले जाते. 


क्लिंजिंग - 


क्लिंजिंग प्रोडक्टमध्ये खूप प्रमाणात केमिकल्स असतात. यामुळे त्वचेतील शुष्कता वाढते. कारण त्वचेतील  तेल शोषले जाते. त्यामुळे स्किन केअर निवडणार असाल तर ती ऑईल  बेस्ड निवडा.  


स्क्रबिंग - 


स्क्रबिंग मधील ग्रॅन्युएल त्वचेला त्रासदायक ठरू शकतात. यामुळे त्वचेवर जळजळ वाढते. तसेच चेहर्‍यावरील तेलाचे प्रमाणे कमी होते. परिणामी त्वचेतील शुष्कता वाढते.  


गरम पाणी - 


 हिवाळ्याच्या दिवसात ऊब मिळावी म्हणून अनेकजण गरम पाण्याचा वापर करतात. पण यामुळे त्वचेतील तेलाचे प्रमाण कमी होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेमध्ये मॉईश्चर टिकून रहावे म्हणून योग्य मॉईश्चरायझरचा वापर करावा.  


 मॅट कॉस्मॅटिक -  


मॅट कॉस्मॅटिकचा वापर केल्यास त्वचेतील नैसर्गिक स्वरूपातील तेलाचे प्रमाण कमी होते. प्रामुख्याने ओठांवर कॉस्मॅटिक लिपस्टिक वापरणं टाळा. 


फेसवॉश -   


दिवसांत दोन वेळापेक्षा अधिकवेळ फेसवॉश वापरणं टाळा. या मुळे त्वचेचे नुकसान अधिक होते. तसेच हिवाळ्यात फेसवॉश निवडताना त्यामध्ये ऋतूमानानुसार आवश्यक असणारी मॉईश्चरबेस्ड घटक असणं आवश्यक आहे.