प्रग्नेंसीदरम्यान स्त्रीच्या शरीरातले महत्त्वाचे बदल
प्रेग्नेंसी दरम्यान महिलेचा आवाज २ डेसिमलपर्यंत कमी होतो.
मुंबई : प्रेग्नेंसी दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. यातील काही बदल हे सर्वसामान्य असतात पण काही बदल हे आश्चर्यकारक असतात. प्रेग्नेंसी दरम्यान महिलेचा आवाज २ डेसिमलपर्यंत कमी होतो. एक संशोधन अहवाल यावर तयार करण्यात आला आहे. प्रेग्नेंट महिलांचा आवाज २ डेसिमलने कमी झाल्याचे सिंगर्स महिलांनी या रिसर्चमध्ये सांगितले. बाळाच्या जन्मानंतर त्यांच्या आवाजात जडपण आल्याचेही त्यांनी सांगितले. हार्मोन्सच्या बदलामुळे असे होत असल्याचे डॉ. कासिया पिसांकी यांच म्हणणं आहे. यासोबत अनेक बदलांची जाणिव प्रेग्नेंट महिलांना होत असते.प्रेग्नेंसी काळात स्त्रीच्या पोटाजवळ खाज सुटत असल्याचेही सांगण्यात येते. याचे प्रमाण जास्त असल्यास Intrahepatic cholestasis of pregnancy (ICP) चा आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
हे बदल
प्रेग्नेंसी दरम्यान यूकेमध्ये दातांचं चेकअप आणि इलाज मोफत होत असतो. प्रग्नेंसी दरम्यान महिलांच्या तोंडाला दुर्गंधी येते.
बऱ्याचदा हिरड्यांचा त्रासही जाणवू लागतो. या समस्या तशा साधारण पण आश्चर्यकारक आहेत.
या काळात महिलांना काही खाण्याची चव लागत नाही.
या काळात महिलांना त्वचा आणि केसांसंबधी समस्यांनाही सामोरं जाव लागत.
काही महिलांनी बाळंतपणानंतर केस गळण्याच्या समस्याही सांगितल्या आहेत.
हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स यांनी केले होते.