पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचे अधिक लक्ष असते!
पुरुष पहिल्या भेटीत महिलांच्या अनेक गोष्टी नोटीस करतात.
मुंबई : पुरुष पहिल्या भेटीत महिलांच्या अनेक गोष्टी नोटीस करतात. तसंच महिलांचेही पुरुषांच्या लहान-सहान गोष्टींकडे बारीक लक्ष असते. पुरुषांच्या नकळत त्या अनेक गोष्टी नोटीस करतात. पाहुया कोणत्या आहेत त्या गोष्टी...
पोट
पातळ पोट असणारे पुरुष महिलांना अधिक भावतात. सर्वात आधी मुलींचे लक्ष मुलांच्या पोटाकडे जाते. पोट न सुटलेल्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात.
लांब पाय
कदाचिक हे ऐकून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटेल. पण लांब पाय असलेल्या पुरुषांमध्ये स्त्रियांना अधिक इंटरेस्ट असतो.
केस आणि दाढी
अनेकदा महिलांचे लक्ष पुरुषांच्या केस व दाढीकडे असते. हा शरीरातील सर्वात वरचा भाग असल्याने त्याकडे सर्वात आधी लक्ष जाणं, अत्यंत स्वाभाविक आहे. महिलांना विस्कटलेले, घाणेरडे केस अजिबात भावत नाहीत. काही महिलांना तर पुरुषांनी शेंडी ठेवणेही आवडत नाही.
हात आणि नखं
महिला पुरुषांचे हात आणि नखं नोटीस करतात. अस्वच्छ हात, नखं महिलांना अजिबात आवडत नाहीत. मुलांनी नखं वाढवलेलीही महिलांना पटत नाहीत.
देहबोली/बॉडी लॅग्वेज
मुलींचं याकडे अधिक लक्ष असतं. तुम्ही कसे उभे राहता, कसे बसता किंवा उठता या गोष्टी मुली नोटीस करतात. त्यातून तुमचा आत्मविश्वास झळकतो. मुलींना आत्मविश्वासू मुलं अधिक भावतात.