work smarter : स्मार्ट वर्क करताय या गोष्टी पाळा, होईल जबरदस्त फायदा...
स्मार्ट वर्क (Smart Work) करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ज्याचा आपल्या कामावर परिणाम दिसणार नाही हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
work smarter : आपण सगळेच क्वालिटी सोडून क्वांटीटीच्या मागे धावत आहोत, त्यामुळे आपल्या मेहनतीला गधामजुरी समजली जाते. काम असं करावं की ज्यात तुमचा स्मार्टपणा दिसेल. ओझं वाहण्याचं काम तर गाढवं ही करतात. आपल्या कामात इतरांपेक्षा वेगळेपणा कसा दिसेल यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे. सध्याच्या जगात ज्याचं काम इतरांपेक्षा वेगळं, त्याला तसा सन्मान ही दिला जातो. (work smarter Follow these things while doing smart work you will get benefits NZ)
हार्ड वर्क (Hard Work) तर सगळेच करतात स्मार्ट वर्क करणारे खूप कमी असतात. अनेकदा आपण स्मार्ट वर्क करायला जातो पण ते करताना आपली ओढाताण होते आणि त्यावेळेस नकळत चुका देखील होतात. स्मार्ट वर्क (Smart Work) करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ज्याचा आपल्या कामावर परिणाम दिसणार नाही हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. साप्ताहिक योजना करा (make weekly plan)
तुम्ही पुर्ण आठवड्यात काय करणार आहात याची योजना आखा. कोणत्या कामांना विशेष प्राधान्य दिले पाहिजे त्यावर कटाक्ष घाला. ती कामं पुर्ण झालीत का? याचा फॉलोअप घ्या. अशाने तुमची कामे झटक्यात पुर्ण होतील.
2. Stop multitasking
एकाच वेळेस एकच काम पुर्ण करण्यावर भर द्या. तुम्ही जेव्हा अनेक कामांमध्ये एकाच वेळेस हात घालता तेव्हा त्याचा रिझल्ट असमाधानकारक मिळतो. तुमच्या कामात तुमचे शहाणपण असते. त्याचा एका वेळेस वापर करु शकता. गरजेचे नाही सगळी कामे तुमची वेळेत पुर्ण होतील त्यामुळे वेळेचा विचार करत एकाच वेळेस एक काम पुर्ण करण्यावर भर द्या.
3. तुमच्या क्षमतेनुसार कर्यभार घ्या (Schedule tasks based on your energy levels)
प्रत्येकाला स्वत:ची क्षमता माहित असते. तुमच्या क्षमते प्रमाणे काम पुर्ण करा. काम पुर्ण करायचे आहे म्हणून अतिरिक्त भार घेऊ नका. त्यामुळे तुमची एनर्जी वायफळ खर्च होईल.
आणखी वाचा - उंचीचा विवाहित जीवनावर परिणाम होतो? पाहा रिसर्चमध्ये काय झालाय खुलासा
4. तुमचा फोन बंद करा (turn off your phone)
काम हाती घेतल्यावर काही वेळासाठी फोन बंद करुन बाजूला ठेवा. जेणेकरुन तुमच्या कामावर चांगलाच फोकस राहील. तुम्हाला स्वत:वर नियत्रंण ठेवता येईल.
5. आधी हाती घेतलेले काम पुर्ण करा (finish what you started)
जे काम तुम्ही सगळ्यात आधी हाती घेता ते काम पुर्ण करण्यावर भर द्यावा. जेव्हा आपले पहिलं काम हे पुर्ण होते तेव्हा आपल्यात चांगलाच आत्मविश्वास दिसतो. या आत्मविश्वासाचा परिणाम आपल्या स्मार्ट वर्क वर दिसतो.
स्मार्ट वर्क करताना तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही अशातला भाग नाही. स्मार्ट वर्क करताना तुमच्या मेंदूवर ताण पडतो आणि हार्ड वर्क करताना तुमच्या शरीरावर. हार्ड वर्क करणे टाळा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)