मुंबई : १ डिसेंबर या दिवसाला खूप महत्त्व आहे. कारण हा दिवस एड्स जागरूकतेला समर्पित आहे. आज दिवसभर याविषयी खूप चर्चा रंगतील. काही या आजाराशी लढण्याबद्दल सांगतील तर काही भेदभाव न करण्याचे आवाहन करतील. पण वास्तव आपल्या समोर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, २०१६ च्या अखेरीस सुमारे ३.५ कोटी जण या आजाराशी लढत आहे.


अाजाराबद्दल अज्ञान 


संशोधनातून असे समोर आले की, अनेकजण अजूनही एड्सविषयी अज्ञान बाळगून आहेत. आपल्याला एड्ससारख्या गंभीर आजाराची लागण झाल्याचे अनेकांना माहितही नसते. जेवढी माहिती असणे गरजेचे आहे ती नसल्याचे वारंवार समोर येत आहे. 


...म्हणजे एड्स नाही


साधारणपणे लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह याचा अर्थ एड्स समजण्यास सुरवात करतात. पण एचायव्ही शरीरात दाखल झाल्यानंतर शरीरातील प्रतिकार शक्ती हळूहळू कमी करतो. 


शरीरावर वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शन परिणाम करु लागतात.
एचआयव्ही पॉसिटीव्ह असण्याच्या साधारण ८ ते १० वर्षांनी या वेगवेगळ्या आजारांची लक्षणे दिसायला सुरूवात होते.


ही लक्षणे असतील तर चाचणी करा 


जर एखाद्याला खालील लक्षणे एका महिन्यापेक्षा अधिक काळ होत असतील तर त्यांनी एचआयव्ही टेस्ट करणे गरजेचे आहे.


१) कोणत्याही कारणाविना आलेला ताप 


२) कोणत्याही कारणाविना अतिसार 


३) सतत कोरडा खोकला


४)  तोंडात पांढऱ्या फोडासारखे निशाण


५) कोणत्याही कारणाविना थकल्यासारखे वाटणे आणि जलद गतीने वजन कमी होणे 


६) स्मरणशक्ती कमी होणे, तणावात जाणे 


ही सर्व लक्षणे सामान्य आजारांमध्येही असतात, त्यामूळे घाबरण्याचे कारण नाही.


एचआयव्हीवर आजून पूर्णपणे इलाज शोधता आला नाही हे दुर्देवी आहे.


पण औषधांच्या मदतीने एचआयव्ही पॉझीटीव्हहोण्यापासून एड्स होण्यापर्यंत वेळ वाढवत येऊ शकते.