मुंबई :  अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. अस्थमाच्या रूग्णांमध्ये श्वसनमार्गात म्युकस जमा होते. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सूज आल्यानेही श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण होतो. धूळ, धूर, प्रदुषण यामुळे अस्थमाचा त्रास अजून वाढतो.    


 योगासनांच्या मदतीने अस्थमा ठेवा आटोक्यात  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शीर्षासन, शलभासन, भुजंगासन,सर्वांगासन, वीरासन, धनुरासन, उष्ट्रासन, सुप्त वीरासन आणि पश्चिमोत्तासन यासारखी योगासनं अस्थमाच्या रूग्णांना फायदेशीर ठरते.  प्राणायमामध्येही नाडीशोधन प्राणायम, उड्डियान, सूर्यभेदी प्राणायम हे फायदेशीर ठरते.  


 अनुलोमविलोम फायदेशीर   


 अस्थमाच्या आजारामुळे शरीरात उष्णता आणि थंडावा यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होते. सकाळ संध्याकाळ 15-15 मिनिटं अनुलोम विलोम केल्याने हे संतुलन नियमित होण्यास मदत होते. अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी लिंग मुद्रा, अपानवायू मुद्रा,प्राण मुद्रा आणि सूर्य मुद्रा फायदेशीर ठरते.  


 अस्थमा मुद्रा अत्यंत गुणकारी 


दम्याचा त्रास कमी करण्यासाठी अस्थमा मुद्रा सर्वात जास्त गुणकारी ठरते. ही मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांची मध्यमा नखांच्या बाजूला एकमेकांवर चिकटवा. दिवसभर ही अस्थमा मुद्रा पाच मिनिटं पाच वेळेस करा. जागतिक अस्थमा दिन - अस्थमाच्या रूग्णांंसाठी फायदेशीर '5' घरगुती उपाय