मुंबई : ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी झाडे-झुडपे, जंगल, जीव-जंतू, पाणी या सगळ्यांचे संरक्षण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहीजे. प्रत्येकाने लहान-मोठ्या कामातून पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने पावले उचलायला हवीत. म्हणजे अगदी घरातील कामे करतानाही आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकतो. कसे? तर त्यासाठी या काही टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# शॉवर घेण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा. असे केल्याने भरपूर पाण्याची बचत होईल.


# शेव्हींग किंवा दात घासताना नळ उघडा ठेवू नका. एक ग्लास, जग किंवा मगात पाणी भरून घ्या आणि गरजेप्रमाणे त्याचा वापर करा. आवश्यक असल्यास पुन्हा पाणी भरून घ्या. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल.


# भांडी घासताना सर्व भांडी घासून घ्या. त्यानंतर धुवा.


# टॉयलेट फ्लशसाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे असा टॉयलेट फ्लश लावा. ज्यात पाण्याचा कमी-अधिक वापर करण्याची सेटींग असेल.


# घर, बागेतील नळ नीट बंद करा. एखादा नळ गळत असल्यास तो दुरुस्त करुन घ्या. नळ दुरुस्त करेपर्यंत नळाखाली बादली टेवा. त्यामुळे वाया जाणारे पाणी बादलीत साठेल आणि पाण्याचा अपव्यय टळेल.


# कपडे भिजवण्यासाठी किंवा धुण्यासाठी वापरलेल्या साबणाच्या पाण्याने बाथरुमची सफाई करु शकता.