मुंबई : गर्भधारणेदरम्यान रक्तदाबाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. गरोदर महिलांमधील उच्च रक्तदाबाचे वेळीच निदान होणं गरजेचे असल्याचे मत खारघरच्या मदरहुड हॉस्पीटल येथील स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. सपना चौधरी-जैन यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे रक्तदाब कमी करण्यासाठी औषधं सुरू करणं, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचाली, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणंही गरजेचं असतं. कारण उच्च रक्तदाब हा केवळ आईच्या आरोग्यासच नाही तर बाळाच्या आरोग्यासही हानीकारक ठरतो. या समस्येला प्रग्नेन्सी इन्ड्युस हायपरटेन्शन (पीआयएच) असेही म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारच्या उच्च रक्तदाब प्रीक्लेम्पसिया सारखा आजार बळावू शकतो. ही मुळातच एक गर्भधारणा व्याधी आहे, ज्यामध्ये उच्च रक्तदाबाची सुरूवात आणि मूत्रामध्ये लक्षणीय प्रथिने आढळून येतात. प्रीक्लॅम्पसियाला कधीकधी विषबाधा म्हणूनही संबोधले जाते. जर स्थिती अधिक बिघडली तर गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या बाळांना हानिकारक ठरु शकते. त्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


प्रीक्लॅम्पसिया हा विकार झाला आहे हे समजून येणे फार अवघड आणि काहीसे जटिल आहे, तरीपण प्रीक्लॅम्पसियाची काही लक्षण आहेत. गर्भरधारणे दरम्यान तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत आहे का? वारंवार छातीत दुखते का? किंवा श्वास घेण्यात अडचणी येतात का?मग, आपण ताबडतोब आपल्या रक्तदाबाची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रीक्लेम्पसिया झालेल्या बहुतेक गर्भवती महिलांना मूत्रामध्ये किंचित भारदस्त रक्तदाब आणि कमी प्रमाणात प्रोटीन असतात.


गर्भावस्थेत उच्च रक्तदाबाची समस्या उद्‍भवल्यास आणि त्यातून मूत्रावाटे प्रथिने जात असल्यास, शरीराला सूज येत असल्यास आण‌ि गर्भधारणेच्या वीस आठवड्यानंतर वजनात दर आठवड्याला पाच पौंडापेक्षा जास्त वाढ होत असल्यास त्याला ‘प्री एक्साम्पस‌यिा’ असे म्हणतात. या अवस्थेतील रक्तदाबामुळे किडनी व यकृताच्या कार्यांमध्येही बिघाड होतो व त्यामुळे अर्भकाची वाढ खुंटते. गेल्या काही दशकांमध्ये स्रिया वयाच्या विशीपेक्षा तिशीत किंवा त्यानंतरच्या काळात गर्भधारणेस प्राधान्य देतात. वास्तविक ही समस्या खूप गंभीर आहे. त्यावर योग्य ते उपचार न झाल्यास गुंतागुंत होऊन आईच्या व बाळाच्या जिवाला धोका संभवतो.


प्रीक्लॅम्पसियाची लक्षणे:


तीव्र डोकेदुखी


अंधुक दिसणे


ओटीपोटातील दुखणे


मळमळ किंवा उलट्या


रक्तातील प्लेटलेट्सचा स्तर कमी होणे(थ्रंबोसायटोनिया)


यकृताचे कार्य कमकुवत होणे


धाप लागणे


अचानक वजन वाढणे आणि सूज



अशी घ्या काळजी :


अधिक आराम करा, जास्त ताण घेऊ नका, योग्य आहार घ्या आणि वेळेत शारीरिक तपासणी करा. सर्व चाचण्या नियमितपणे करणे आवश्यक आहे जसे रक्त आणि लघवीच्या चाचण्यादेखील. मूत्रातील प्रथिनेंच्या पातळीचे सतत निरीक्षण तसेच रक्तदाब त्याच्या सुरुवातीच्या काळात प्रीक्लेम्पसिया निश्चित करण्यात मदत करेल. आणि हे यामधून सर्वात अनुकूल परिणाम सुनिश्चित करेल