पोलिओ हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या मध्ये अर्धांगवायू  होण्याची ही खूप शक्यता असते.  हे टाळण्यासाठी जागरूकता  खूप महत्वाची आहे, म्हणून ही लक्षणे आणि कारणे जाणून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिओ हा पोलिओ विषाणूमुळे होतो. काही रुग्णांना अर्धांगवायूचा त्रास होतो तर बहुतेक लोकांना कमी किंवा कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. वाइल्ड पोलिओव्हायरसचे टाइप 2 आणि 3 सध्या अस्तित्वात नाहीत, पण टाइप 1 अजूनही अनेक भागात अस्तित्वात आहे. पोलिओ रोखण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे लसीकरण आहे करण अजून त्यावर कोणताही उपरचार सापडला नाही आहे. 


जाणून घेऊया  पोलिओव्हायरस कसा पसरतो?


तज्ज्ञांच्या मते पोलिओचा विषाणू तोंडातून किंवा नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करतात. यानंतर ते पोटात आणि आतड्यांमध्ये वाढू लागतात. पोलिओचे  विषाणू   तुमच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये ही प्रवेश करू शकतात आणि शरीरात पक्षाघात ( stroke ) होऊ शकते. त्यामुळे  हात, पाय किंवा तुमचा श्वास नियंत्रित करणारे स्नायू अर्धांगवायू होऊ शकतात. तर विशेष म्हणजे  पोलिओ विषाणूची लागण फक्त माणसांनाच होऊ शकते. तर अश्या  खालील मार्गांनी पोलिओचे  विषाणू  तोंडातून शरीरात प्रवेश करतात. 


पोलिओ होण्याची कारणे : 


संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे, अन्न किंवा संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेले पाणी किंवा इतर पेये खाणे, संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकणारे थेंब आपल्या संपर्कात येणे,  प्रदूषित पाण्याच्या संपर्कात आलेले अन्न खाल्ल्याने आणि कच्चे किंवा कमी शिजवलेले अन्न खाणे. 


पोलिओची लक्षणे : 


ताप, थकवा, मळमळ, डोकेदुखी, सर्दी किंवा खोकला, घसा खवखवणे, मान आणि पाठीचा कडकपणा, पोट, हात आणि पाय मध्ये अस्वस्थता वाटणे. 


पोलिओची लक्षणे किती दिवसात दिसतात ? 


पोलिओची लक्षणे संसर्गानंतर 3 ते 21 दिवसांनी दिसू लागतात. बहुतेक पोलिओव्हायरस रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना आजाराची जाणीवही नसते. पण  ताप, थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळ आणि स्नायू कडक होणे ही त्याची किरकोळ लक्षणे आहेत. जर तुम्ही पोलिओची लस घेतली नसेल, तर तुम्हाला पोलिओ विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याच वेळी, गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लहान मुलांनी विशेषतः प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. 


रुग्णसेवा करतानाही असू शकतो धोका : 


लसीकरण न केलेल्या पोलिओ रुग्णासोबत राहताना किंवा त्याची काळजी घेत असताना निरोगी व्यक्तीलाही या संसर्गाचा धोका असू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक काळजी घ्यावी.