मुंबई : आपल्या संस्कृतीमध्ये ‘विवाह’ हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे अरेंज मॅरेजच्या पद्धतीने तुम्ही लग्न करणार असाल तर अनेक कुटुंबात आजकाल जात, धर्म, जन्मपत्रिका, गुण अशा अनेक गोष्टींचा विचार करून लग्न ठरवले जाते. पण सुखी , समाधानी व आरोग्यदायी सहजीवनासाठी केवळ इतकेच महत्त्वाचे नाही  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर सुखी सहजीवन घालवायचे असेल तर तुम्हांला काही वैद्यकीय चाचण्या करणंदेखील गरजेचं आहे. म्हणूनच तुमच्या लग्नपत्रिकेमधील गुणांसोबतच तुमच्या शारिरीक स्थितींचाही विचार करून काही योग्य निर्णय घेतल्यास भविष्यातील अनेक त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.  


आज जागतिक थॅलिसेमिया दिन आहे. या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही लग्नापूर्वी वैद्यकीय चाचणी का करायला हवी हे नक्की जाणून घ्या. 


जनुकीय दोषांवरील चाचणी –


भविष्यात तुम्ही बाळाचा विचार करणार असाल तर जनुकीय दोषांवरील चाचणी फायदेशीर ठरते. तुम्ही अथवा तुमचा भावी जोडीदार यांच्या शरीरातील काही अनुवांशिक जनुकांचा तुमच्या बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो . यामुळे थॅलेसेमिया हा विकार जडू शकतो. 


थॅलिसेमिया या आजारात जनुकीय रक्त दोषांमुळे , बाळाच्या शरीरात रक्तपेशींची निर्मिती होत नाही व त्यास वारंवार उसन्या रक्ताचा आधार घ्यावा लागतो. याप्रमाणेच डाउन सिण्ड्रोम, कर्करोग, लहान मुलांमधील मधुमेह असे विकार जडण्याचीही शक्यता आहे .


कशी असते ही चाचणी ?


जनुकीय दोष चाचणी करिता तुमच्या रक्ताचे नमुने घेतले जातात . जवळच्या नात्यांमध्ये दोन – तीन पिढ्यांत विवाह झालेले असतील तर गंभीर स्वरूपाचा थॅलॅसेमिया होतो. अशावेळी  कुटुंबाच्या प्रत्येक पिढीमधील व्यक्तींची वैद्यकीय माहिती घेऊन त्यांच्या  रक्ताच्या चाचण्या केल्या जातात .बहुतेक रक्ततपासणी प्रयोगशाळेतून थॅलॅसेमियाचे निदान होते. मात्र जनुकीय दोषांवरील उपचारांमध्ये समुपदेशनही गरजेचे असते.