मुंबई : आपल्या बैठ्या जीवनशैलीत आपल्या शरीराची फार कमी हालचाल होते. पुरेसा व्यायाम शरीराला मिळत नाही. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी रक्तप्रवाह शरीरभर सुरळीत होणे गरजेचे आहे. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी दीर्घ श्वसन आणि व्यायाम हे उत्तम उपाय आहेत. रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने कार्डिओव्हक्युलर आजार, स्टोक्स आणि ब्लड क्लॉट्स यांसारख्या समस्यांना आळा बसतो. रक्तप्रवाह योग्य न झाल्यास शरीरात पोषकतत्त्व कमी प्रमाणात शोषले जातात. शरीराचे कार्य उत्तम चालण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही योगासने...


ताडासन:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताडासनामुळे फुफ्फुसे उभ्या कक्षेत स्ट्रेच होतात आणि त्यांची क्षमता वाढते. प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही या आसनाचा फायदा होतो. यात केलेल्या दीर्घ श्वसनामुळे रक्तप्रवाह सुधारतो.


त्रिकोणासन:


त्रिकोणसानामुळे रक्त प्रवाह सुधारतो. ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) ला प्रतिबंध होतो. तसंच हे आसन बद्धकोष्ठतेवर देखील फायदेशीर ठरते. प्रेग्नसी मध्ये देखील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी तुम्ही हे आसन करू शकता.


एकपाद राजकपोतासन:


हे आसन मूत्रमार्गातील विकारांवर व कंबरेच्या दुखण्यावर फायदेशीर आहे. शरीराची ताठरता जावून शरीर लवचिक बनतं. तसंच रक्तप्रवाह सुधारून शरीराच्या आतल्या अवयवांची कार्यक्षमता सुधारते.


सर्वांगासन:


सर्व शरीराची कार्यक्षमता सुधारते. तसंच याचा परिणाम श्वसन संस्थेवर ही होतो. त्याचबरोबर पाठकण्याला ऑक्सिजन आणि रक्ताचा योग्य पुरवठा होवून मज्जसंस्थेच्या विकारांना प्रतिबंध होतो.


उष्ट्रासन:


या आसनामुळे गर्भाशयाला रक्ताचा योग्य पुरवठा होतो. ऑक्सिजनचे अभिसरण सुधारण्यास मदत होते. तसंच श्वसनाच्या विकारांवरही हे आसन फायदेशीर आहे. जेष्ठ नागरिकांसाठी देखील हे आसन उत्तम कार्य करते.


शशांकासन:


या आसनामध्ये शरीराच्या वरच्या भागाला ताण मिळून तो भाग रिलॅक्स होतो. तसंच चिंता दूर होवून हलकं वाटतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.