मुंबई : योग केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यासोबतच त्वचा आणि केसांनाही याचा फायदा होतो. सुंदर त्वचा आणि चमकत्या केसांसाठी प्राणायम सर्वात महत्त्वपूर्ण मानलं जातं. यामुळे ताण कमी होतो. रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढून रक्ताभिसरण सुरळित होण्यास मदत होते. योगासनांमुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ उत्तम राहतं. नाडी तंत्र सुरळित होतं. मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौंदर्यांसाठी योग आवश्यक आहे. योगमुळे शरीराला पर्याप्त मात्रामध्ये पोषाहार प्राप्त होतो. योगमुळे त्वचेमध्ये असणारे विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत होते. 


योगासनांमुळे त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्वचा रोगांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. ही प्रक्रिया केसांसाठीही लागू होते. 


जेव्हा एखाद्याला तणाव वाटतो, त्यावेळी मस्तिष्क, रक्तात एड्रेनालाइन सोडतं. एड्रेनालाइनमुळे हृदयाचे ठोके जलद होतात. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. सतत तणावात राहिल्याने हृदयाशी संबंधी समस्यांचा धोका वाढतो. जे लोक अधिक तणावात राहतात, त्यांना इतरांच्या तुलनेत हृदय रोग होण्याची शक्यता अधिक असते. दररोज योग केल्यास ताण-तणावापासून दूर राहण्यास मदत होते. 


दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगप्रति जागरुकता निर्माण करणं हा जागतिक योग दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. यावर्षी १ ते ७ मार्च २०२० हा आठवडा योग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.