मुंबई : आजकाल नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचे खूप कमी ऐकू येते. बदललेली जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अयोग्य वेळा व सवयी यामुळे महिलांचे नॉर्मल डिलिव्हरची शक्यता कमी झाली आहे. सिझेरियननंतर महिलांना पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी खूप वेळ लागतो. तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण योगसाधनेच्या मदतीने नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवता येईल. त्यासाठी ही आसने करणे फायदेशीर ठरेल. 


वक्रासन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी योगामॅटवर दोन्ही पाय समोर घेऊन बसा. पाय समोर पसरा. एक वेळेस एक पाय दुमडा. जो पाय दुमडा असेल त्याच्या विरुद्ध हात मागे नेवून मागे वळा. त्यानंतर दुसरा हात मागे न्या. या आसनात कमीत कमी २-३ मिनिटे बसा. श्वासावर लक्ष ठेवा. 



उत्कटासन


सपाट जागेवर मॅट घालून उभे रहा. दोन्ही पायात थोडे अंतर ठेवा. आता हात सरळ पसरा. कोपऱ्यातून दुमडू नका. त्यानंतर खुर्चीवर असे बसतो त्याप्रमाणे पाय फोल्ड करा. १ मिनिट या स्थितीत रहा आणि हळूहळू पूर्वस्थितीत या.



कोनासन


हे आसन करण्यासाठी सर्वात आधी सरळ उभे रहा. आता दीर्घ श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आता श्वास सोडत थोडे उजव्या बाजूला झुका. त्यानंतर पु्न्हा मध्यभागी येऊन डाव्या बाजूला झुका. ही क्रिया करताना श्वासाकडे लक्ष द्या. श्वास सोडत बाजूला झुका आणि श्वास घेत पुन्हा मध्यभागी या. 


गर्भारपणात ही आसने करु नयेत:


  • नौकासन

  • चक्रासन

  • अर्धमत्स्येंद्रासन

  • भुजंगासन

  • विपरीत शलभासन

  • हलासन


टिप : गर्भारपणात योगासने करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. त्याचबरोबर योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगासने करणे योग्य ठरेल.