Health News : योगर्ट आणि दह्यामधील फरक अनेकांना समजत नाही. मात्र बहुतेक लोक दही म्हणूनच योगर्टचा वापर करतात. मात्र दही आणि योगर्ट हे दोन्ही वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ आहेत. योगर्टमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी योगर्ट हा एक चांगला पर्याय आहे. (yogurt to the diet cause weight gain or loss latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगर्टमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. योगर्टमध्ये झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात. हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं आहेत. योगर्टचा आहारात समावेश केल्याने तुमचं वजनही कमी होण्यास मदत होते.


पोषक तत्वांनी समृद्ध
योगर्टमध्ये कॅल्शियम असतं जे हाडे, सांधे आणि दातांसाठी खूप चांगलं असते. त्यात व्हिटॅमिन बी 12 आणि रिबोफ्लेविन असते, हे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे देखील असतात.


या लोकांनी खाऊ नये योगर्ट 
योगर्ट  आरोग्यासाठी चांगले आहे. त्यात अनेक फ्लेवर्स असल्याने लहान मुले दह्याच्या तुलनेत ते आरामात खाऊ शकतात. त्याचे अनेक फायदे असूनही, ते खाण्यापूर्वी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला लैक्टोज असहिष्णुता असेल तर ते खाऊ नका. लैक्टोज असहिष्णुता असलेले काही लोक ते पचवू शकतात. ज्या लोकांना दुधाची ऍलर्जी आहे त्यांनी योगर्ट खाऊ नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)