आय ड्रॉप्स घालताना तुमच्याकडून नकळत होतात `या` चुका!
आय ड्रॉप्सचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे.
मुंबई : आय ड्रॉप्सच्या माध्यमातून डोळ्यांच्या अनेक समस्यांवर उपचार केले जाऊ शकतात. डोळ्यांचं संक्रमण, डोळ्याला असलेली दुखापत किंवा ग्लुकोमासारख्या तक्रारींवर उपचार करण्यासाठी डोळ्यांच्या ड्रॉप्सचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त डोळे कोरडे पडणं तसंच डोळे लाल होणं या तक्रारींसाठीही डॉक्टर आय ड्रॉप्सचा सल्ला देतात. तुम्हीही आय ड्रॉप्स वापरत असाल मात्र आय ड्रॉप्सचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे.
जाणून घेऊया आय ड्रॉप्सचा योग्य पद्धतीने वापर
सर्व प्रथम, आपल्या पाठीवर झोपा आणि डोकं मागील बाजूला वाकवा. आता आपल्या बोटाने आय ड्रॉप जिथे जाईल डोळ्याची ती खालची पापणी हळूवार खाली खेचा.
आता आय ड्रॉपची बाटली डोळ्यावर अशी धरा ज्यामध्ये ड्रॉपरची टीप खालच्या बाजूला असेल. ड्रॉपरची टीप डोळ्यास स्पर्श न करता शक्य असेल तितक्या जवळ असली पाहिजे. आपल्या कपाळावर मनगट विश्रांती घेत आपण बाटली धारण केलेल्या हाताचा आधार घेऊ शकता.
बाटली अशा प्रकारे दाबा की, ड्रॉप डोळ्याच्या खालच्या भागात पडेल
हळूवारपणे डोळे बंद करा आणि आपला चेहरा दोन ते तीन मिनिटांपर्यंत जमिनीच्या बाजूला झुकवा. यादरम्यान, डोळे मिटणं, डोळे हलवणं आणि पापण्या कडकपणे बंद करण्याचा प्रयत्न करू नका.
तुमच्या डोळ्याभोवती आलेलं पाणी पुसण्यासाठी टिशूचा वापर करू शकता.
जर तुम्ही दुसऱ्या डोळ्यातही ड्रॉप्स घालणार असाल तर 5-10 मिनिटांनी घाला.
आय ड्रॉप्सचा वापर करताना नेमकं काय करावं?
आय ड्रॉपचं झाकणं उघडताना हात स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवा
एक्सपायरी डेट नेहमी पडताळून घ्या
डोळ्यांसाठी जर ऑइंटमेंट वापरत असाल तर ड्रॉप्सच्या वापरानंतर ऑइंटमेंट लावा.
या चुका करू नका
ड्रॉपची टीप डोऴ्यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या
आय ड्रॉपचा वापर करताना कॉन्टॅक्ट लेन्सेस घालू नका.
तुमचा आय ड्रॉप इतर कोणा व्यक्तीशी शेअर करू नका