Parenting Tips :  लहान मुलांना मोठं करणं सोपं नाही. आज कालची मुलं तर बापरे यांना घडवणे तर अजून कठीण झालं आहे. आपली मुली हे सुसंस्कृत असावी, त्यांच्या हातातून कुठलीही चुकू घडून नये म्हणून पालक फार जागृत असतात. तुम्हाला हे माहिती आहे की मुलांसाठी आपण त्यांचे आदर्श असतो. ते आपल्याला सतत निखून पाहत आणि आपलं बोलणं ऐकत असतात. त्यामुळे आपण अनेक वेळा पाहिले आहे अरे हा अगदी तुझ्यासारखा बोलायला लागला आहे किंवा वागतो. म्हणून पालकांनी कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मुलांसमोर काही गोष्टी कधीही बोलू नका. तुमच्या नकळत तुमच्या या बोलण्याचा मुलांवर परिणाम होतो. चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि पॅरेंटिंग टीनएजर एक्स्पर्ट अँजेला कारंजा यांनी पालकांसाठी काही टीप्स दिले आहेत. 


पती-पत्नी एकमेकांबद्दल वाईट बोलू नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांसमोर कधीही पती-पत्नीने एकमेकांविषयी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल वाईट बोलू नका. जर घरात आपण मुलांसोबत सतत या गोष्टी करत राहिला तर त्यांचा मनावर या गोष्टीचा परिणाम होतो. आपण रागात भांडणात जे काही ज्या सदस्याबद्दल बोलतो ते मुलं ऐकतात. त्याचा परिणाम त्या सदस्याबद्दल मुलाचा मनात द्वेष निर्माण होतो. मुलांसाठी असं पालकांपैकी एका बद्दल द्वेष निर्माण झाल्यास ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुलांसमोर कोणाहीबद्दल वाईट, टीका आणि शिव्या देऊन बोलू नका. 


जबाबदाऱ्यांची भीती


आज स्पर्धेचं युग आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. आई-वडील दोघे पण नोकरी करतात. अशावेळी घरातील जबाबदारी, पैसे आणि आजार पण याबद्दल मुलांसमोर बोलू नका. मुलांसमोर सतत पैसावरुन आपण बोलो तर याचा परिणाम मुलांवर होतो त्यांचा मनात पैसे जबाबदारीबद्दल भीती निर्माण होते. 


मुलांची तुलना इतरांशी करु नका


मुलांची तुलना इतरांशी कधीच करु नका. प्रत्येक मुला हा वेगळा असतो, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्ही सतत मुलाची तुलना एखाद्या मुलाशी करत राहिलात तर त्या मुलाविषयी त्याचा मनात द्वेष निर्माण होऊ शकतो. तसंच तुमच्या मुलाचा विश्वासही तुटतो आणि तो सतत एका दडपणाखाली वावरतो. 


मुलांना त्यांचा भावना व्यक्त करण्याची संधी द्या


मुलांवर कधी दु:खी होऊ नका. तसंच हे इतकं पण वाईट नव्हतं, असं वाक्य मुलांना कधी बोलू नका. जर तुमचा मुलगा काही कारणामुळे दु:खी आहे तर त्याला हसायला सांगू नका. या गोष्टीचा त्यांचा मनावर परिणाम होतो. असं केल्याने मुलं आपलं दु:ख कधी दाखवत नाही. तर ते दुसऱ्यांसमोर कायम आनंदी आहेत असं दाखवतात. याचा त्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कधी कधी मुलांना म्हणा, कधी कधी काही ठिक नाही, हे म्हणं पण योग्य आहे. 


तुला जन्म देऊन चूक केली


मुलांना तुला जन्म देऊन चूक केली, तू जन्मालाच नव्हता आला पाहिजे होता, अशासारखे वाक्य कधी मुलांना म्हणू नका. तुम्ही किती रागतात असाल, चिडला असाल तरीही चुकूनही अशी वाक्य मुलांना बोलू नका. कारण मुलं कितीही मोठं असो आई-वडिलांचं हे वाक्य त्याला सहन होत नाही. या वाक्यामुळे मुलं दुखावली जातात आणि त्याचा आत्मसन्मानाला ठेस पोहोचते. पुढे जाऊन त्याला कोणीच पसंत करत नाही, असं त्याला वाटू लागतं.