Health Tips: आपण सतत कामामध्ये व्यस्त असतो त्याचबरोबर धावपळ, उकाडा आणि प्रदूषणामुळे आपल्या शरीराला घामाचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा आपण कुठे प्रवास करत असू आणि आपल्याला अंगाला घाम आला तर आपल्याला खूपच अनकम्फेर्टेबल वाटू लागते किंवा क्लब पार्टीला जाण्यापूर्वी परफ्यूम वापरायला विसरलो तेव्हा आपल्याला लाज वाटावे लागते. कारण जेव्हा आपल्या शरीराला घाम येऊ लागतो. तेव्हा आपल्या शरीरात बॅक्टेरियांमुळे वास येऊ लागतो, या जीवाणूंमुळे आपण आजारीही पडू शकतो तेव्हा या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण काय केले पाहिजे त्यासाठीचे उपाय जाणून घेऊया. 


खोबरेल तेल
जखमा भरण्यासाठी आपण खोबरेल तेलाचाही वापर करतो कारण असे केल्याने जखमेवर बॅक्टेरिया बसत नाहीत आणि जखमही कमी वेळात बरी होते. त्यामुळे तुम्ही नारळाचे तेल रोज वापरावे.नारळाच्या तेलात प्रतिजैविक गुणधर्म असतात जे शरीरातून दुर्गंधी येऊ देत नाहीत.


काखेत लिंबू लावा
लिंबू हे नैसर्गिक जंतुनाशक म्हणून ओळखले जाते. याचे सेवन करणे शरीरासाठीही फायदेशीर मानले जाते. हे दुर्गंधी रोखते आणि त्वचेवर जमा झालेले बॅक्टेरिया काढून टाकण्याचे काम करते तसेच लिंबू शरीरातील बॅक्टेरियासह हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळे आंघोळ करताना पाण्यात लिंबाचा रस घाला. 


मेथीचे सेवन
मेथीचे सेवन केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होते त्याचप्रमाणे शरीर डिटॉक्स करण्यासाठी लोक मेथीचे सेवन करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचारावर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)