तुमची लिपस्टीक विषारी तर नाही, संशोधनात सापडलं हे धोकादायक केमिकल
अनेक महिलांना मेकअप करणं आवडतं. मग त्यामध्ये लिपस्टिक, काजळ, मस्कारा तसंच आय शॅडो या गोष्टी आल्याचं. तुम्हाला देखील मेअकप करायला आवडत असेल तर सावधान...कारण तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवणाऱ्या या कॉस्मेटीक्समध्ये विषारी घटक असतात.
मुंबई : अनेक महिलांना मेकअप करणं आवडतं. मग त्यामध्ये लिपस्टिक, काजळ, मस्कारा तसंच आय शॅडो या गोष्टी आल्याचं. तुम्हाला देखील मेअकप करायला आवडत असेल तर सावधान...कारण तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवणाऱ्या या कॉस्मेटीक्समध्ये विषारी घटक असतात.
70 पेक्षा अधिक कॉस्मेटीक्स ब्रँड्सवर केला स्डटी
एनवॉयरमेंटल विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये विषारी रासायनिक फ्लोरीन मिसळलं जातं. हा अभ्यास कॅलिफोर्नियाच्या ग्रीन सायन्स पॉलिसी इन्स्टिट्यूटने केला आहे. या संस्थेने हा अभ्यास जगातील 70 हून अधिक प्रसिद्ध कॉस्मेटिक्सच्या ब्रँडवर केला आहे.
अभ्यासात सापडलं विषारी रसायन
मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये आढळणारं फ्लोरीन हे असंच एक रसायन आहे जे कीटकनाशकांमध्ये वापरलं जातं. हे एक अतिशय विषारी रसायन आहे. जर तुम्ही या रसायनाच्या संपर्कात आलात तर तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
भारतातील महिलांच्या एका वर्षात सरासरी 22 ग्रॅम लिपस्टिक पोटात जाते. त्यामुळे हे संशोधन फार धोकादायक आहे. हा धोका कसा ओळखायचा आणि ते कसं टाळायचं. हे सांगण्यासाठी, आम्ही एक अहवाल तयार केला आहे.
231 गोष्टींच्या नमुन्यांची चाचणी
रंगीबेरंगी लिपस्टिक लावण्याचा आवड किती धोकादायक आहे हे या महिलांना माहित नाही. अमेरिकेतील एनवॉयरमेंटल विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हे उघड झालं आहे की, मेकअपशी संबंधित 231 गोष्टींचे नमुने तपासण्यात आलेत. ज्यात 52 टक्के उत्पादनांमध्ये भेसळ असल्याचं आढळून आले. फ्लोरीन हे 82% वॉटरप्रूफ मस्करा ब्रँडमध्ये, 63% फाउंडेशन आणि 62% लिपस्टिक ब्रँडमध्ये आढळतं.
फ्लोरीन हे एक असं धोकादायक केमिकल आहे जे तुमच्या शरीरासाठी फार धोकादायक ठरू शकतं. यामुळे कॅन्सर, थायरॉईड किंवा यकृताच्या आजारांचं कारण बनतं. त्यामुळे जर तुम्ही कॉस्मेटीक्सचा वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा.