YouTube Videos : युट्यूब... हातात स्मार्टफोन असणाऱ्या प्रत्येकावरच या माध्यमाची भुरळ पडली आहे. जगाच्या पाठीवर असणारे असंख्य व्हिडीओ, असंख्य विषय, अगणित चेहरे आणि तितकेच विषय या एका माध्यमावर तुम्हाला पाहता येतात. म्हणजे इथं भारतात बससून तुम्ही थेट चीन, जपानपासून अलास्कापर्यंतचं राहणीमान, राजकारण, हवामान बदल असं सारं सारंकाही पाहू शकता, तेसुद्धा अगदी मोफत. पण, आता याच युट्यूबवरून बऱ्याच व्हिडीओंवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये तुमचाही एखादा व्हिडीओ असू शकतो बरं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

YouTube नं नुकताच एक असा निर्णय घेतला आहे, ज्या माध्यमातून फसवी माहिती देत व्ह्यूअर्समध्ये गैरसमज निर्माण केले जाणारे व्हिडीओ डिलीट केले जाणार आहेत. ज्या व्हिडीओंच्या माध्यमातून चुकीची माहिती दिली जात आहे त्यांना आता युट्यूबवर जागा दिली जाणार नाही. लसुण खाल्ल्यानं कर्करोगावर उपचार करता येतो असे सल्ले देणारे व्हिडीओ आता युट्यूबवर दिसणार नाहीत. (YouTube Health Video)


नव्या ब्लॉगपोस्टमधून यासंदर्भातील माहिती युट्यूबनं दिली. वैद्यकिय किंवा आरोग्यविषयक चुकीच्या माहितीला इथून पुढं युट्यूबवर जागा दिली जाणार नाही. एखाद्या आजारावरील उपचार, त्याचा प्रतिकार करण्यासाठीचे मार्ग आणि तत्सम सल्ले देणारे तथ्यहिन व्हिडीओ सध्या युट्यूब डिलीट करत आहे. ठराविक आरोग्य अवस्था, उपचारांसाठी हा नियम लागू असेल. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या विरुद्ध सल्ले आणि उपायांना इथं आळा घातला जाणार आहे. 


कारवाई सुरु....


गंभीर आजारांवरील उपचार, काही असेल सल्ले देणारी मंडळी ज्यांच्या व्हिडीओंमुळं अनेकदा काहीजण डॉक्टरांकडेही जाणं टाळतात असे सर्व व्हिडीओ आता युट्यूबवरून हद्दपार होणार आहेत. ज्या व्हिडीओंना कोणताची वैज्ञानिक संदर्भ नाही पण तरीही त्यातून उपचार आणि तत्सम सामग्रीची माहिती देण्यात आली आहे. त्यातूनही (Cancer) कर्करोग, कोरोना (corona) आणि प्रजनन क्षमतेवर भाष्य करणारे, उपाय सुचवणारे व्हिडीओ पूर्णत: हटवले जाणार आहेत. 


हेसुद्धा पाहा : Photos : मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; सोयीसुविधा पाहून म्हणाल काय ती श्रीमंती... 


 


स्वयंघोषित डॉक्टर, किंवा आरोग्यजतज्ञांचे अनेक सल्ले तुम्हालाही घरातल्यांनी सांगितले असतील. उपलब्ध माध्यमातून मिळणारी माहिती अनावधानानं एक युजर म्हणून तुम्हीआम्ही पाहतो, ती इतरांनाही सांगतो. पण, यात तत्थहीन माहितीच सर्वाधिक असल्यामुळं वापरकर्त्यांच्या आरोग्याची हेळसांड न होऊ देण्यासाठी YouTube नं ही पावलं उचलली आहेत. 15 ऑगस्टपासून असे सर्व व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात झाली असून, येत्या काळात या कारवाईला वेग येणार आहे.