अबब!!! 1 किलो भाजी 82 हजार रूपयांना...औरंगाबादच्या शेतकऱ्याची कमाल
हॉप शूट्स, ही जगातली सर्वात महागडी भाजी आहे. हॉप शूट्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ किलोला १ हजार युरो, म्हणजे तब्बल ८२ हजार रुपये आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील करमडीच्या अमरेश कुमार सिंह यांनी आपल्या शेतात ही भाजी पिकवली आहे.
मुंबई : हॉप शूट्स, ही जगातली सर्वात महागडी भाजी आहे. हॉप शूट्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ किलोला १ हजार युरो, म्हणजे तब्बल ८२ हजार रुपये आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील करमडीच्या अमरेश कुमार सिंह यांनी आपल्या शेतात ही भाजी पिकवली आहे.
हजारो रुपयांना विकल्या जाणाऱ्या या पिकाने त्यांचे नशीब पालटले आहे. या भाजीचे गुणधर्म ऐकाल, तर थक्क व्हाल.
भाजीची एवढी किंमत का?
1. किंमत जास्त असण्याचं कारण म्हणजे या भाजीचे औषधी गुण.
2. अँटीबायोटिक औषधांमध्ये हॉप शूट्स वापरली जाते.
3. कॅन्सर, टीबी या आजारांवरील औषधांमध्ये त्याचा वापर होतो.
4. हॉप शूट्सच्या फुलांचा वापर बिअर बनवण्यासाठी केला जातो.
5. औषधी गुणांबरोबरच पिकवण्यासाठी असणारे कष्ट जबर किंमतीला कारणीभूत आहेत.
अमरेश कुमार यांना वाराणसीच्या भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राची मोलाची मदत झाली आहे. कृषी वैज्ञानिक डॉ. लाल यांचे मार्गदर्शन घेऊन अमरेश यांनी हॉप शूट्सचा मळा फुलवला आहे. भारत सरकारने आता या भाजीवर संशोधन सुरू केले आहे. पारंपारिक शेतीला बगल देऊन अशा नगदी पिकांकडे वळले, तर शेतकऱ्यांचे दिवस पालटायला वेळ लागणार नाही.