भारतात 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख रुग्णांचा मृत्यू; लॅन्सेट जर्नलची मोदी सरकारवर कडाडून टीका
मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या संपादकीयमध्ये 1 ऑगस्टपर्यंत भारतात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या संपादकीयमध्ये 1 ऑगस्टपर्यंत भारतात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॅन्सेट हे ब्रिटनमध्ये प्रकाशित होणारे प्रसिद्ध मेडिकल जर्नल आहे.
इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मीटिक्स ऍंड इव्हॅल्यूएशनच्या आधारे आकड्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. ही एक स्वतंत्र जागतिक आरोग्य संशोधन संघटना आहे.
लॅन्सेटने मोदी सरकरवर कठोर टीका केली आहे. जर देशात दिवसाला दहा लाख कोरोना रुग्णांची नोंद व्हायला लागली तर, या आपत्कालीन परिस्थितीसाठी मोदी सरकार जबाबदार असणार आहे. भारताला कोविड19 वर नियंत्रण मिळवण्यात सुरूवातील यश मिळाले होते. परंतु एप्रिल पर्यंत भारत सरकारची कोविड 19च्या टास्कफोर्सची काही महिन्यांपासून बैठकच झालेली नव्हती.
सुपरस्प्रेडर समारंभांचा इशारा देऊनही पूर्ण देशात धार्मिक सणांना परवानगी देण्यात आली. सोबत प्रचंड मोठ्या राजकीय सभा, रॅली घेण्यात आल्या. ज्यामध्ये कोविड प्रतिबंधक उपाययोजनांकडे दूर्लक्ष केले गेले.
तत्काळ उपाययोजनांची गरज
लॅन्सेटने भारतातील कोरोना नियंत्रणासाठी दोन स्तरीय निती अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. सर्वात आधी अयशस्वी लसीकरणाच्या पद्धतीत बदल करावा. लसीकरणात सुसूत्रीकरण आणावं आणि गतीमान करावं.
दुसरीकडे कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी गतीने काम करावं लागेल. योग्य आणि खरे आकडे प्रसिद्ध करावे लागतील. लोकांना सत्य कळायला हवे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कठोर नियमावली लागू करावी ज्यात राष्ट्रीय लॉकडाऊनचा पर्यायही असेल.